मनमाड-येवला मार्गावर अपघात, सहा ठार

अपघाताचं कारण अस्पष्ट 

Updated: Nov 21, 2018, 08:35 AM IST
मनमाड-येवला मार्गावर अपघात, सहा ठार  title=

मुंबई : बुधवारी पहाटेच्या सुमारास मनमाड- येवला मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे. 

अनकाई किल्ला परिसरात इर्टिगा आणि आयशर टेम्पोची जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला.  यामध्ये एकूण सहाजणांचा मृत्यू झाला असून, त्यात तीन महिला, दोन पुरूष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. 

मृतांविषयी विस्तृत माहिती समोर आली नसून अपघाताचे मूळ कारणही अद्यापही अस्पष्ट आहे. 

सकाळी पाच ते साडेपाचच्या सुमरास हा भीषण अपघात झाला. इर्टिगामधील सहाजण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.