नगरसेवक समर्थकांची व्हॉलमनला मारहाण, संतप्त कामगारांचे कामबंद आंदोलन

पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या संतप्त जमावाला आश्वासन देण्यात आल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

Updated: Jun 10, 2019, 03:11 PM IST
नगरसेवक समर्थकांची व्हॉलमनला मारहाण, संतप्त कामगारांचे कामबंद आंदोलन title=

निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : मनमाड नगरपालिकेने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ पाणी सोडण्यास नकार दिल्यामुळे नगरसेवकांच्या समर्थकांनी व्हॉलमॅनला मारहाण केली. या गंभीर प्रकरणावपर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. याच्या निषेधार्थ कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या संतप्त जमावाला आश्वासन देण्यात आल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

मनमाड शहरात तीव्र पाणीटंचाई असून, पालखेड  धारणातून मिळालेल्या आवर्तनातून टंचाई लक्षात घेता. पालिकेने केवळ 1 ते दीड तास पाणी देण्याचे नियोजन केले.मात्र नगरसेवक पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून  जास्त वेळ पाणी देण्यास सांगतात. याच कारणावरून हनुमान नगर भागात एका  नगरसेवकांच्या समर्थकांनी एका व्हॉलमॅनला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या  कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करून धरणे आंदोलन केले. कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे  शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. शहरातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी  यशस्वी मध्यस्थी केली आणि  पालिका प्रशासनाने  मारहाण  करणाऱ्या नगरसेवक समर्थकांविरुद्ध कारवाईं करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले.

मनमाड शहरात तीव्र पाणी टंचाई आहे. शहराला काही दिवसांपूर्वी टँकरनेही पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र सध्या पालखेड आवर्तनातून  शहारातील प्रत्येक भागात एक ते दीड तास पाणी पुरवठा करण्याचा निर्णय नगरसेवक आणि प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. परंतु नगरसेवक आपल्या भागात जास्त पाणी सोडण्याचा  आग्रह धरत असतात. त्यातून  वाद उद्भवत आहे. असे असले तरी पाणी टंचाईत होरपळत असलेल्या शहरातील नागरिकांना  कारण वेठीस धरण्याचा प्रकार केला जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त आहे. पाणी टंचाई लक्षात घेता पालिकेने घेतलेला एक पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.