मध्यरात्री तिघे गावात घुसले, गावकऱ्यांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत एक ठार, नंतर वेगळेच सत्य समोर

Man Beaten To Death In Parbhani: परभणी जिल्ह्यात चोर असल्याच्या संशयातून तिघांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Updated: May 27, 2023, 03:56 PM IST
 मध्यरात्री तिघे गावात घुसले, गावकऱ्यांनी चोर समजून केलेल्या मारहाणीत एक ठार, नंतर वेगळेच सत्य समोर title=
Man Beaten To Death On Suspicion Of Being Thief In parbhani

Parbhani Crime News: परभणी (Parbhani) जिल्ह्यातील उखळद येथे भयंकर घटना घडली आहे. मध्यरात्री तीन वाजता गावात आलेल्या तिघा जणांना गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. गावकऱ्यांच्या मारहाणीत त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर इतर दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Mob Beaten Man)

किरपानसिंग सुजितसिंग भौड असे मयताचे नाव आहे. सदर मयत आणि हेबलसा खुर्द येथील रहिवाशी आहेत. परभणीच्या पोलीस अधिक्षक आर. रा. सुधा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तिघे जण चोरीच्या उद्देशाने उखळद गावात आले होते, असा संशय गावकऱ्यांना होता. या संशयातून जमावाने तिघांना बेदम मारहाण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सदरची घटना रात्री तीन वाजण्याच्या सुमाराची आहे. 

गावकऱ्यांनी तिघांना पकडल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना सांगत असताना गावकऱ्यांनी चोर पकडले आहेत अशी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत त्यातीत एकाला अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा त्यापैकी एका जणांचा मृत्यू झाला. 

पत्नीच्या प्रियकराला जेवायला बोलवलं, रात्री बाजूलाच झोपवलं, अन् सकाळी घडला एकच थरार

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मयताच्या नातेवाईकाकडून सदर दोघे जण हे डुक्कर पकडण्यासाठी गावात गेले होते असा दावा करण्यात येत आहे. तर,  जखमींनी पोलिसांनी दिलेल्या बयानावरून ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उखळद येथील एकाला पोलिसांनी संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चोर समजून मारहाण केल्याचे हे प्रकरण गंभीर असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे.

मोठी बातमी! दादर स्थानकात होणार मोठा बदल, प्रवाशांचा गोंधळ थांबणार

दरम्यान, मुंबईतही अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. चोर समजून जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे. नाशिक येथून आलेला तरुण बोरिवलीत फिरत असताना त्याला काही जणांनी हटकले मात्र त्यांच्या प्रश्नांला नीट उत्तरे न मिळाल्याने तो चोर असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी चोर चोर ओरडत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अन्य तीन जण तिथे आले त्यांनीही त्याला मारहाण केली व त्याला कस्तुरबा पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तिथे त्याच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर पोलिसांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेले मात्र तिथे नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. राज्यात सलग अशा दोन घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.