इंदापूरजवळ भीषण अपघातात ४ ठार, १७ जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ ट्रक, मिनीबस आणि मृतदेह घेऊन जाणा-या अँबुलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सतरा जण गंभीर जखमी झालेत. 

Updated: May 31, 2017, 01:43 PM IST
इंदापूरजवळ भीषण अपघातात ४ ठार, १७ जखमी title=

इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ ट्रक, मिनीबस आणि मृतदेह घेऊन जाणा-या अँबुलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर सतरा जण गंभीर जखमी झालेत. 

मुंबईतील रतन आप्पा सुतार हे त्यांच्या मुलाचा मृतदेह घेऊन त्यांच्या मुळगावी मंगळवेढा येथे चालले होते. त्यांच्यासोबत कुटुंबातील सर्व लोक मिनी बसमध्ये होते. 

इंदापूरजवळ आल्यावर अँब्युलन्स आणि मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी होती. त्यातच पाठीमागून येणा-या ट्रकने मिनी बसला जोरदार धडक दिली. तर मृतदेह घेऊन जाणारी अँब्युलन्सही पलटी झाली. यात मिनी बसमधील चारजण जागीच ठार झाले. जखमीवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.