MPSC | एमपीएससीच्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, पण का?

 स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं तरुणांचं स्वप्न असतं. यासाठी अनेक जण जीवाचं रान करुन मेहनत घेतात.  

Updated: Jan 15, 2022, 09:13 PM IST
MPSC | एमपीएससीच्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, पण का? title=

पुणे : स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं तरुणांचं स्वप्न असतं. यासाठी अनेक जण जीवाचं रान करुन मेहनत घेतात. काही वेळा सरकारच्या कचखाऊपणामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नैराश्य येतं. तर कधी अपयशामुळे. अशाच एका एमपीएससीच्या (Maharashtra Service Public Commission) विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमर मोहिते (Amar Mohite) असं या तरुणाचं नाव आहे. अमर पुण्यातील सदाशिव पेठेत  राहत होता. तो गेल्या 2 वर्षांपासून पोलीस उपनिरिक्षक (Police Sub Inspector) पदासाठी तयारी करत होता. (maharshtra service public commission student amar mohite cumiit suicide due to family reason at pune)

नक्की काय झालं?

"अमर शारिरीक चाचणीत फक्त 1 मार्क कमी पडला. म्हणजेच अवघ्या एका गुणाने त्याची ही संधी हुकली. त्यामुळे तो निराश होता. त्यातूनच अमरने पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली", अशी प्रतिक्रिया अमरच्या मित्रांनी दिली. तसेच मराठा आरक्षण टिकलं असतं तर अमरची संधी हुकली नसती, असंही म्हंटलं जातंय.  

पोलिसांचं म्हणंन काय?  

दरम्यान अमरने आत्महत्या कौटुंबिक कारणातून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. "अमरला नैराश्य आलं होतं. मात्र एमपीएससीतील अपयश किंवा आरक्षणाचा आत्महत्येशी संबंध नव्हता", असं विश्रामबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे म्हणाले. 

दरम्यान काही महिन्यांपूर्वी स्वपनील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यात 24 वर्षीय स्वप्नीलने (Swapnil Lonkar) गळफास घेत आत्महत्या केली होती. स्वप्नीलने अथक परिश्रम घेऊन एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण केली, पण दीड वर्ष उलटूनही त्याला नोकरी मिळाली नव्हती.