Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!

Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.

Updated: Jan 27, 2023, 07:07 PM IST
Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत! title=
Maharastra Politics,Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : मागील आठवड्यापासून राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचं नाव चर्चेत आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बळ मिळेल असं वाटलं होतं, घडतंय मात्र उलटच. प्रकाश आंबेडकरांच्या मविआतल्या एंट्रीआधीच आंबेडकर विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी (Cong-NCP) असं स्पष्ट चित्र निर्माण झालंय. आणि याला कारणीभूत ठरतायत स्फोटक विधानं. आमची आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, राष्ट्रवादी-काँग्रेससोबत नाही, अशी टोकाची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली. त्यामुळे ठाकरे गटाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. (Maharastra Politics mahavikas aghadi failure in alliance Prakash Ambedkar roles Congress NCP angry Uddhav Thackeray Marathi Political News)

शरद पवार (Sharad Pawar) भाजपचे आहेत असा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला. हे कमी होतं म्हणून की काय... वेळ पडली तर भाजपसोबत जाऊ, असा बॉम्ब प्रकाश आंबेडकरांनी टाकला. आता आंबेडकरांच्या याच विधानांमुळे आघाडीत मीठाचा खडा पडल्याचं सांगितलं जातंय. प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर ठाकरे गटानं (Thackeray group) उघड नाराजी व्यक्त केलीय. प्रकाश आंबेडकरांनी शब्द जपून वापरावेत, असा खणखणीत इशारा संजय राऊतांनी (Sanjay Raut) दिलाय. 

ठाकरे गटाने आंबेडकरांचे कान टोचले असले तरी राष्ट्रवादी आंबेडकरांवर नाराज आहे. मुंबईबाहेर वंचित बहुजन आघाडीला जागा सोडण्याचा प्रश्न नाही, असं राष्ट्रवादीने ठाकरे गटाला कळवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेसने (Congress) तर आंबेडकरांची दखलही घ्यायला नकार दिलाय. आंबेडकर-ठाकरे युतीचा महाविकास आघाडीशी काही संबंध नाही, असं म्हणत काँग्रेसनं आंबेडकरांना एकप्रकारे बेदखल केलंय.

दलित आणि मुस्लिम मतं ही प्रकाश आंबेडकरांची ताकद मानली जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी लक्षणीय होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे-आंबेडकर युती झाली. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकरांचं (Prakash Ambedkar On Ncp Congress) अजून काहीच ठरताना दिसत नाहीये. 

आणखी वाचा  - संजय राऊत म्हणतात 'जपून बोला' तर प्रकाश आंबेडकर म्हणाले 'तुम्ही कोण...'

दरम्यान, बोलणीप्रक्रिया राहिली दूर... टोकाच्या भूमिका आणि स्फोटक विधानांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी प्रकाश आंबेडकरांना मविआत घेण्यास उत्सुक नाही असंच दिसतंय. यात तारेवरची कसरत ठाकरे गटाची होताना दिसतेय. आंबेडकरांना सांभाळायचं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीलाही दुखवायचं नाही असा पेच ठाकरेंसमोर आहे. त्यामुळे वंचितच्या एंट्रीनं आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे राजकारणाला (Maharastra Politics) कोणतं नवं वळण लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.