Anjali Damania demanded narco test of Ajit Pawar : पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अजित पवार पत्रकार परिषदेत गांगरल्या सारखे वाटत होते. ते काहीतरी लपवत आहेत असं वाटतंय. अजित पवारांचे फोन जप्त करावा करावा आणि त्यांची नार्के टेस्ट करावी, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
काय म्हणाल्या Anjali Damania?
आमदार सुनील टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये का आले होते? कोणाच्या सांगण्यावरुन आले होते? हे एकदा टिंगरेंना देखील विचारलं पाहिजे. काल त्यांनी जे जे सांगितलं ते धादांत खोटं होतं. अजित पवारांनी निश्चितच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं अजित पवारांचा फोन खरंतर जप्त झाला पाहिजे खरंतर त्यांची नार्को टेस्टही व्हायला हवी होती, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. अजित पवार नेहमी पत्रकार परिषदेमध्ये भडकून बोलत असतात, तेच अजित पवार कालच्या पत्रकार परिषदेत गांगरल्यासारखे वागत होते, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांचा पुण्याच्या आयुक्तांना फोन आला होता का? असेल तर त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावं. फोन केला की नाही? फोन केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केलीये. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करावी, अशी मागणी देखील दमानिया यांनी केलीये.
पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी CP पुणे यांना फ़ोन केला होता का याचा ताबडतोब खुलासा CP यांनी करावा pic.twitter.com/8jNA4XLKvi
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 27, 2024
दरम्यान, ससून हॉस्पिटलमधील शिपाई अतुल घटकांबळे याला पोलिस आयुक्तालयात आणले. याच प्रकरणात घटकांबळेची आज चौकशी केली जातीये. या चौकशीत आणखी कोणी घटकांबळेशी संवाद साधला का? त्यासोबतच डॉक्टर तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या वेतिरिक्त आणखी तिसऱ्या व्यक्तीचा या प्रकरणात संबंध आहे का? हे तपासण्यासाठी पुणे गुन्हे शाखेकडून आज घटकांबळेची कसून चौकशी केली जातीये.