Winter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा

Winter Assembly Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरु होणार आहे. अनेक मुद्यांवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे

Updated: Dec 19, 2022, 07:34 AM IST
Winter Session : राज्याचं आजपासून हिवाळी अधिवेशन, नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवाद्यांचा सरकारला इशारा title=
maharashtra winter assembly session nagaur 19 December 2022 Naxalists warn the government CM Eknath Shinde and Devendra FadnavisMaharashtra News in Marathi nmp

Maharashtra Legislature Winter Session : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होतंय.. पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळण्यावर भर असणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात कसोटी असणार आहे. विशेष म्हणजे नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे संध्याकाळी नागपुरात दाखल होणार आहेत.

या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार?

दुसरीकडे विरोधकांनी अधिवेशनात आक्रमकपणे सरकारला घेरण्याचे संकेत दिलेत. महापुरूषांचा अपमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, बेरोजगारी हे मुद्दे घेऊन विरोधक सरकारला घेरणार आहेत. 

महाविकास आघाडीची आज बैठक

महाविकास आघाडीची आज संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. अजित पवार, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित असतील. सरकारने रविवारी जाहीर केल्याप्रमाणे नवं लोकायुक्त विधेयक आजच सभागृहात मांडलं जातंय का याकडे सर्वांचं लक्ष असेल. नागपुरात अधिवेशन सुरू असताना अनेक मोर्चे, निदर्शनं विधीमंडळाबाहेर करण्यात येणार आहेत. यंदा सुमारे मोर्चांची संख्या 61 हून अधिक आहे. ( maharashtra winter assembly session nagaur 19 December 2022 Naxalists warn the government CM Eknath Shinde and Devendra FadnavisMaharashtra News in Marathi)

सरकार नागपुरात, नक्षलवादी सक्रीय

नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवादी सक्रीय झाले आहेत.  नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिलाय. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा... सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित  सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा असं आवाहनही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून केला आहे...  बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्युरोने आज हे प्रेस रिलीज काढलंय. तसंच तेंदूपत्तालाही जीएसटीतून सूट देण्याची मागणी नक्षल्यांनी केली.