Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त

Maharashtra Weather Update : सहसा सप्टेंबर महिन्यानंतर हिवाळ्याची चाहूल चागते आणि नोव्हेंबर उलटून जाईपर्यंत थंडीचा कडाका प्रचंड वाढतो. 

सायली पाटील | Updated: Nov 23, 2023, 07:03 AM IST
Weather Update : पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पाहून चिंता वाढेल; पाहा सविस्तर वृत्त  title=
(छाया सौजन्य- स्कायमेट)/ Maharashtra Weather Update no signs of winter many regions may experiance rainfall

Weather Update : राज्यात सुरु असणारा ऋतू नेमका कोणता, याचाच अंदाज बांधणं आता कठीण झालं आहे. वर्षभर कमीजास्त प्रमाात कोसळणारा पाऊस, थंडीच्या ऋतूमध्ये वाढणारा उष्णतेचा दार आणि उन्हाळ्यातही कोसळणाऱ्या पावसाच्या सरी यांमुळं ऋतुचक्रातील बदल अनेकांच्याच चिंतेत भर टाकताना दिसत आहेत. त्यातच आता हवामान विभागानं नव्यानं अंदाज वर्तवत या चिंतेत भर टाकली आहे. 

हवामान विभागाच्या वृत्तानुसार सध्या देशात पश्चिमी झंझावात सक्री आहे. ज्यामुळं दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूच्या किनारपट्टी भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत आहे. त्यातच बंगालच्या उपसागरामध्येही चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं हवामानात मोठे बदल झाले आहेत. थोडक्यात पुढील 24 तासांसोबतच पुढच्या तीन दिवसांसाठी राज्याचा कोकण पट्टा आणि लागूनच असणाऱ्या गोव्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यामध्ये पावसाची चिन्हं आणि दमट हवामानामुळं येथील हवेमध्ये आर्द्रतेचं प्रमाणही अधिक दिसून येत आहे. 

हेसुद्धा वाचा : दहा वर्षांपासून रिक्त असेलल्या ११,१८४ सदनिका म्हाडा विकणार; कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी

कोकण पट्ट्यामधील हवामानबदलाचे परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र दिसून येतील. तर, 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी येथे सोसाट्याचे वारे आणि जोरदार पावसाशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतातील किनारपट्टी भागांमध्ये तयार होणाऱ्या वाऱ्यांची स्थिती आणि त्यांचे परिणाम म्हणून या हवामान बदलांवर सध्या आयएमडीसुद्धा लक्ष ठेवून आहे. 

उर्वरितम महाराष्ट्रात हवामानाचा काय अंदाज?

उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वातावरण कोरण राहणार आहे. सकाळच्या वेळी या भागांमध्ये धुक्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं दृश्यमानता तमी असेल. तर, काही भागांमध्ये काळ्या ढगांचं सावट असेल. पाऊस मात्र बरसणार नाही. 

राज्याचा काही भाग कोरडा राहणार असल्यामुळं उत्तर महाराष्ट्रात तापमानात सरासरी दोन अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. पण, दक्षिण महाराष्ट्राला मात्र उष्णतेच्या झळा सोसाव्या लाहणार आहेत. एकंदरच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्याचा काही भाग कडाक्याची थंडी, काही भाग उष्ण वातावरण तर, काही भाग पावसाच्या सरी असं हवामान अनुभवणार आहे.