Maharashtra weather : उन्हाचा तडाखा वाढणार, पाऊस निरोप घेणार? राज्यातील हवमानाबाबत IMD चा इशारा

Maharashtra weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं मोठ्या प्रमाणात शेतपिकांचं नुकसान केलं. परिस्थिती पाहून बळीराजा हवालदिल झाला. आता हवमान खातं म्हणतंय...   

Updated: Mar 27, 2023, 08:07 AM IST
Maharashtra weather : उन्हाचा तडाखा वाढणार, पाऊस निरोप घेणार? राज्यातील हवमानाबाबत IMD चा इशारा  title=
Maharashtra weather temprature will increase amid ongoing heat wave rain predictions at some regions

Maharashtra weather : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात पुन्हा एकदा पश्चिमी झंझावात (Western Disturbance) एसक्रीय होणार आहे. ज्यामुळं संपूर्ण उत्तर भारतासह देशातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. हवामान विभागानं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 29 मार्च पासून पश्चिमी झंझावाताचे थेट परिणाम दिसून येणार आहेत. गुरुवार आणि शुक्रवारी देशातील काही भागात पावसाची हजेरी असून, किमान तापमानात घट होणार आहे. (Maharashtra weather temprature will increase amid ongoing heat wave rain predictions at some regions)

महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढणार 

सोमवारी तापमान 31 ते 36 अंशांच्या दरम्यान असेल, तर आकाश निरभ्र राहील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वगळता देशातील इतर भागांमध्ये उन्हाचा दाह हळुहळू वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. येत्या काळात कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून अवकाळी काढता पाय घेणार असून, कमाल तापमानात 4 अंशांची वाढ होऊ शकते. 

हेसुद्धा वाचा : Ajinkya Rahane : मराठमोळ्या रहाणेला BCCI कडून मोठा धक्का; आता फक्त निवृत्ती…!

मुंबई, पालघर आणि कोकणात किनारपट्टी भागामध्ये उन्हाचा तडाखा दुपारच्या वेळेस आणखी तीव्र होताना दिसणार आहे. तर, संख्याकाळच्या वेळी या भागात सोसाट्याचे वारेही सुरु शकतात. 

देशातील वातावरणावर काय परिणाम करणार पश्चिमी झंझावात? 

आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकाचा दक्षिण भाग, (Tamilnadu) तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ (Kerala) आणि माहे या भागात 26 ते 29 मार्चदरम्यानच्या काळात पावसाची हजेरी राहू शकते. काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसू शकतात. तर, बिहार, झारखंड, ओडिशा आणि सिक्कीममध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

देशाच्या पश्चिम आणि मध्य भागामध्ये कमाल तापमानात वाढ नोंदवली जाईल, त्यापलीकडे हवामानात कोणतेही बदल दिसून येणार नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. किमान पुढचे पाच दिवस तापमान वाढणार असलं तरीही उष्णतेची लाट येणार नसल्यामुळं ही दिलासादायक बाब ठरत आहे. 

हिमाचलला जाताय? बर्फवृष्टीमुळं रक्त गोठवणारी थंडी 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांत हिमाचल, अरुणाचलमध्ये बर्फवृष्टी होणार आहे. त्यामुळं सुट्टीच्या निमित्तानं हिमाचलच्या वाटेवर निघणार असाल, तर त्याप्रमाणं तयारीतच निघा. दरम्यान, Skymet च्या अंदाजानुसार आणखी एका Western Disturbance मुळं देशातील राजधानीसह इतर भागांवर हवामान बदल दिसून येऊ शकतात. परिणामी मार्च महिन्याअखेरीस पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा या भागांना पावसाचा मारा सहन करावा लागू शकतो.