विदर्भात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, काही ठिकाणी पूरस्थिती

Maharashtra unseasonal rain :  यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. तर यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ - दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Updated: May 3, 2023, 04:26 PM IST
विदर्भात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, काही ठिकाणी पूरस्थिती title=

Maharashtra unseasonal rain : विदर्भाला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यवतमाळ आणि वाशिममध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. परभणी येथे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वर्ध्यात अवकाळी पावसाचा जोरदार बॅटिंग केली आहे. पावसामुळे पोहणा-वेणी नाल्याला पूर आला आहे. परिसरातील गावकऱ्यांना जीव धोक्यात टाकून करावा प्रवास लागत आहे. पाच ते सहा शेतात नाल्याच्या पुराचे पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.  काल मध्यरात्रीपासून सुरु असून धुवाधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचा संपर्क तुटला आहे.

 नाल्याच्या पुरामुळे वेणी, जांगोना, पिपरी,शेकापूर,खापरी,कोलही, खेकडी, धानोरा यासह एकूण 12 ते 14 गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे.  तर जळगाव येथे अवकाळी पावसामुळे वाघुर धरणाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने जामनेर शहरात पुढील काही दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यवतमाळ येथे दारव्हामधील अडान नदीला पूर आला आहे. यवतमाळ - दारव्हा मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दळवळणाची साधने बंद असल्याने अनेकांना पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागल आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाने शतेकरी हतबल झाला आहे.

जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक विजांचे खांब कोसळल्याने अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे त्यातच जामनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरण क्षेत्रातही वीज पुरवठा खंडित झाल्याने वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत जामनेर शहरात पाणीपुरवठा बंद राहणार असून जामनेर नगरपालिकेने ध्वनी क्षेपकाद्वारे नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.

अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. हाता तोंडचा आलेला घास गेल्याने परभणी जिल्ह्यातील एक शेतकरी हुंदके देत दुःख व्यक्त केले आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात या पावसाने हळद या पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. हळद उत्पादक शेतकऱ्याची झाकून ठेवलेला हळदीचा बंडा भिजल्याने शेतकरी हतबल झालाय.