पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १०वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. यंदा दहावीचा निकाल ८९. ४१ टक्के इतका लागलाय. त्यामध्ये ९१.९७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यायत, तर ८७.२७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के इतका लागलाय. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागलाय.
लातूर - ८६.३० टक्के
अमरावती - ८६.४९ टक्के
बोर्डातर्फे ५७ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यापैकी ११ विषयांचा निकाल १०० टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल - ८६.८७ टक्के
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षाची टक्केवारी ०.६७ टक्के
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा - ४०२८
शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळा - ३३
९ विभागांमधून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यापैकी १४ लाख ५६ हजार २०३ विद्यार्थी उत्तीर्ण
- www.maharashtraeducation.com
या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहता येईल. तसंच त्यावर निकाल डाऊनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढच्या वापरासाठी डाऊनलोड केलेला या निकालाची प्रिंट काढावी लागणार आहे.
तुम्ही एसएमएस सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. बीएसएनएल मोबाईल क्रमांकावरून ५७७६६ या क्रमांकावर MHSSC <space> <seatno> लिहून मेसेज पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच निकाल उपलब्ध होईल.
असा पाहा निकाल
- प्रथम महाराष्ट्र मंडळाच्या ऑफिशियल वेबसाइट www.mahresult.nic.in वर क्लिक करा
- आता मुख्यपृष्ठ लिंक एसएससी परीक्षा निकालावर क्लिक करा
- क्लिक केल्यानंतर सुरु झालेल्या पेजवर आपली माहिती अपलोड करा
- क्लिक करून आपण आपला रिजल्ट स्क्रीनवर पाहू शकाल
- येथूनच रिझल्ट डाउनलोड करा आणि प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा
१ मार्च ते २४ मार्चपर्यंत दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेला एकूण १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १६ लाख ३७ हजार ७८३ नियमित विद्यार्थी होते. एकूण विद्यार्थ्यांपैकी ९ लाख ७३ हजार १३४ विद्यार्थी आणि ७ लाख ७८ हजार २१९ विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.