शिवजयंतीला महाराष्ट्र सदनात प्रशासनाकडून गोरखा रेजिमेंटचा अपमान

 शिवजयंतीला महाराष्ट्र सदन प्रशासनाकडून गालबोट 

Updated: Feb 19, 2020, 02:20 PM IST

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : शिवजयंतीला महाराष्ट्र सदन प्रशासनाकडून गालबोट लागले आहे. सहाय्यक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी आर्मी जवानांना कॅंटीनमधून हाकलून बाहेर काढले आहे. कायरकर यांनी महाराष्ट्र सदनात गोरखा रेजिमेंटचा अपमान केला आहे. 

शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आर्मीचे विशेष बॅंड आले होते. हे जवान सकाळी ६ वाजल्यापासून महाराष्ट्र सदनात उपस्थित होते. महाराष्ट्र सदन कॅंटीनमध्ये जेवायला बसले असताना त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. संतप्त झालेल्या शिवभक्तांची आणि कायरकर यांची झाली बाचाबाची.

महाराष्ट्र प्रशासन कार्यालयाच्या या सहाय्यक निवासी आयुक्तांवर कारवाई होणे गरजेचे आहे.