मुंबई : राज्यात 24 तासांत 63 हजार 294 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 349 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 हजार 8 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत. झपाट्याने वाढत असलेली रूग्णसंख्या पाहाता राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही.
तर मुंबईत आज 9 हजार 989 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 58 जणांचा बळी गेला आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वातावरण चिंता वाढवणारं आहे.
Maharashtra reports 63,294 new #COVID19 cases, 34,008 recoveries and 349 deaths in the last 24 hours
Total cases: 34,07,245
Total recoveries: 27,82,161
Death toll: 57,987
Active cases: 5,65,587 pic.twitter.com/2PtRxUsuJ8— ANI (@ANI) April 11, 2021
COVID19 | 9,989 new positive cases and 58 deaths reported in #Mumbai today pic.twitter.com/q106E2hGwy
— ANI (@ANI) April 11, 2021
कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 2 हजार 405 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 16 हजार 145 आहे. तर एका दिवसांत 890 कोरोना बाधित रुग्णांना डीचार्ज मिळालेला आहे. गेल्या 24 तासांत 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.