मुंबई : आज राज्यात ३,८३७ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर आज ८० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५९% एवढा आहे. आजचा कोरोनाबाधितांचा आकडा कमी आहे. तसेच आज ४१९६ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६८५१२२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३९% एवढा झाला आहे.
Maharashtra reports 3,837 new #COVID19 cases, 4,196 recoveries/discharges, & 80 deaths in the last 24 hours, as per State Health Department
Total cases: 18,23,896
Total recoveries: 16,85,122
Active cases: 90,557
Death toll: 47,151 pic.twitter.com/GUM7tYn7Ik
— ANI (@ANI) November 30, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १०८५६३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८२३८९६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५३५५३० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १५४७३ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १६१९१ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा १९८६१ इतका आहे.
#CoronavirusUpdates
30-Nov; 6:00pmDischarged Pts. (24 hrs) - 775
Total Recovered Pts. - 2,56,635
Overall Recovery Rate - 91%Total Active Pts. - 13,008
Doubling Rate - 207 Days
Growth Rate (23 Nov-29 Nov) - 0.34%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) November 30, 2020
देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला.