मुंबई : आज राज्यात ५६०० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर आज १११ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.५८% एवढा आहे. तसेच आज ५०२७ नवे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १६९५२०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२% एवढा झाला आहे.
Maharashtra recorded 5,600 new coronavirus cases, 5,027 recoveries, and 111 deaths in the last 24 hours, according to State Health Department
Total cases: 18,32,176
Total recoveries: 16,95,208
Active cases: 88,537
Death toll: 47,357 pic.twitter.com/R9FCpigC3w
— ANI (@ANI) December 2, 2020
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १०९८९४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८३२१७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५४७७९१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६०७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ओरडते. मुंबईत १४९१२ रुग्ण ऍक्टिव आहेत तर ठाणे १५४५७ कोरोनाबाधित रुग्ण ऍक्टिव आहेत. पुण्यात ऍक्टिव कोरोनाबाधितांचा आकडा हा २०४२५ इतका आहे.
#CoronavirusUpdates
२ डिसेंबर, सायंकाळी ६:०० वाजता२४ तासात बरे झालेले रुग्ण- २०५
आजवर बरे झालेले एकूण रुग्ण- २,५७,३४८
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ९१%एकूण सक्रिय रुग्ण- १३,०६०
दुप्पटीचा दर- २२२ दिवस
कोविड वाढीचा दर (२५ नोव्हेंबर-१ डिसेंबर)- ०.३१%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 2, 2020
देशात आणि संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावानं मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातही चिंचा वाढवली आहे. दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडले आणि काही अंशी झालेल्या बेजबाबदार वर्तनामुळं पुन्हा एकदा काहीसा नियंत्रणात येणारा कोरोना फोफावला.