Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार

Maharashtra Rain News : मुंबईत मागीत काही दिवसांपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असताना राज्यात मात्र पुढील काही दिवस पावसाचे असल्याचं सांगण्यात आलं आहे

सायली पाटील | Updated: Jul 6, 2023, 07:29 AM IST
Maharashtra Rain News : रायगडमध्ये रेड अलर्ट; कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार  title=
Maharashtra Rain update red alert for raigad latest weather news

Maharashtra Rain News : मुंबईसह महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या पावसानं आता चांगलाच जोर धरला असून कोकणाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, मुंबई, ठाण्यात पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्य़ा माहितीनुसार राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. त्यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, 'IMD ने आज महाराष्ट्रासाठी पुढील 4, 5 दिवसांसाठी तीव्र हवामानाचा इशारा जारी केला आहे. पुढील 3, 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी' असेल. इथं राज्यात बऱ्याच काळानंतर देण्यात आलेल्या रेड अलर्टकडे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. फक्त रायगडचट नव्हे तर रत्नागिरी भागातही अती मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे. 

हेसुद्धा वाचा : शिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाच्या पूर्वसूचना..

आयएमडीतडून रायगड जिल्ह्यासाठी अती मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याबाबतची पूर्वसूचना देण्‍यात आली आहे. ज्या धर्तीवर जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्‍यात आलीये. हवामानशास्त्र विभागाचा हा इशारा पाहता सध्या पूरप्रवण क्षेत्र, दरडग्रस्त भाग आणि खाडीच्या लगत असणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, पावसाळी मासेमारीसाठी खाडी किंवा सखल समुद्रातही न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

साताऱ्यातील घाटमाध्यावरही पावसाचा जोर वाढलेला असेल. तर, नाशिक, पुणे आणि कोल्हापुरातही पावसाची दमदार हजेरी असेल अशी शक्यात वर्तवली जात आहे. विदर्भातही उद्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि परभणीसाठी हवामान विभागानं यलो अलर्ट दिला आहे.