Maharashtra Politics: ''सकाळी उठल्यावर जे सुरू होते त्यानं...'' चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

Chandrashekar Bawankule on Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. ते नागपुरात एका भूमीपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. 

Updated: Dec 18, 2022, 04:18 PM IST
Maharashtra Politics: ''सकाळी उठल्यावर जे सुरू होते त्यानं...'' चंद्रशेखर बावनकुळे यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा title=
Chandrashekar Bawankule

पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर: ''नागपूरात हिवाळी अधिवेशन (Winter Session) होत आहे. यामध्ये विदर्भातील आणि मराठवाड्याचा प्रश्न सुटणार आहेत पण संजय राऊत (Sanjay Raut) यांना सत्ता गेल्यापासून काहीच सुचत नाही आहे. सकाळी उठल्याबरोबर जे सुरू होते त्याला आता महाराष्ट्र बोर झाला आहे'', अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे. ते नागपुरात एका भूमीपूजन कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी 60 कोटी मंजूर केल्याने त्यांचे यावेळी आभार मानले आहे. (maharashtra politics chandrashekar bawankule critizes sanjay raut saying now maharashtra has got bored)

अनेक वर्षापासून श्री क्षेत्र संत जगनाडे महाराजांचं जन्मस्थान असलेलं सुदुंबरे तिर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी निधीची मागणी होती. त्यासाठी 60 कोटी रुपयांचा विकास आराखड्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली. तो निधी मंजूर करण्याची घोषणा केली. मागच्या सरकारने घोषणा केली मात्र पैसे दिले नव्हते मात्र आता निधी मिळणार असल्यानं जन्मस्थळाचा विकास होणार आहे. 

यावेळी बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी यावेळी संजय राऊत आणि कालच्या मविआच्या मोर्च्यावरही टीका केली. ''संजय राऊत यांनी डोळ्यावर काळा चष्मा घातला आहे. त्यांना ऐकायला जात नाही आणि त्यांना दिसतही नाही. महविकास आघाडीने मुंबईतील कालचा मोर्चा एका लग्नाच्या वऱ्हाडाप्रमाणे होता, असे वऱ्हाडी आम्ही खूप बघितले आहे. त्या मोर्चातल्या 50% लोकांना माहीती नव्हतं आपण कशासाठी आलो आहे. महापुरूषाच्या नावानं राजकारण करण्यासाठी हा मोर्चा होता हे जनतेला पटलं नाही.'', असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनता असं राजकारण करणाऱ्या लोकांना कंटाळली आहे. जनतेला विकास पाहिजे. जनतेचा विश्वास शिंदे फडणवीस सरकारवर आहे. मागील सरकारने महाराष्ट्राला बरबाद केलं. आता हे सरकार महाराष्ट्राला सुजलाम करत आहे. सरकारच्या कामात रोडा घालण्यासाठी हे मोर्चे काढले जातात म्हणून मोर्चाला गर्दी नसल्याची टीकाही केली. त्या मोर्चातले व्हिडिओ पाहिले. हा मोर्चा फसला होता. महाराष्ट्राला अशा मोर्चाची अपेक्षा नाही. महाराष्ट्राला विकासाची अपेक्षा आहे, असेही पुढे ते म्हणाले. 

हेही वाचा - First Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श

मविआनंतर त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावरही निशाणा साधला. ''अडीच वर्ष सरकार होतं तेव्हा नागपूरला अधिवेशन घेतलं नाही. ज्यांनी मराठवाडा विदर्भाचा विकास करण्याऐवजी विदर्भात अधिवेशन घेतलं नाही त्यांनी विदर्भावर अन्याय केला. नागपूर करार मोडला, बेईमानी केली. त्यामुळे सरकारवर बोलण्याचा त्यांचा अधिकार नाही. या अधिवेशनात आम्ही विदर्भ मराठवाड्याचे प्रश्न सोडवणार'', असेही बावनकुळे म्हणाले. 

संजय राऊत हे जेलमधून... 

संजय राऊत जेलमध्ये राहून थोडे बिघडले आहेत. दिल्लीला गेल्यावर अमित भाईंचे आभार मानले पाहिजे. त्यांनी सीमा भागातील मुद्द्यावर तणाव निर्माण करू नये यासाठी प्रयत्न केले. हा प्रश्न 70 वर्षे जुना आहे. सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याची वाट बघितली पाहिजे. एक टाचणी भर जागा कर्नाटकला जाणार नाही. एवढे पुरावे सरकारने दिले आहे. सरकार गेल्यापासून हे तिन्ही पक्ष वेगळ्या मनस्थितीत आहे. सरकार गेल्यापासून ठाकरे गटातले अनेक जण शिंदे गटात जात आहे. यांच्यासोबत कोण राहणार? कारण यांचा संवाद नाही. आमदारांना खासदारांनी वाईट वागवलं. यांच्याकडे होते तेव्हा ते शिवसैनिक होते आता त्यांना ते रेडे म्हणत आहे. आता तुम्ही याविषयी बोलण्यापेक्षा महाराष्ट्रात काय झालं पाहिजे त्यावर बोला. विकासावर बोला. सरकारकडून काम करून घ्या, ही तुमची जबाबदारी आहे. सकाळी उठल्याबरोबर जे सुरू होते त्याला आता महाराष्ट्र बोर झाला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.