Maharashtra Politics BJP Leader Nilesh Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन निलेश राणेंनी ही घोषणा केली आहे. निलेश राणेंच्या समर्थकांसाठी ही मोठी धक्कादायक बातमी असल्याची चर्चा कोकणच्या राजकारणामध्ये सुरु आहे. निलेश राणेंनी अचानक तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.
निलेश राणेंनी दसऱ्याच्या दिवशी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये निलेश राणेंनी, "मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही," असं म्हणत निवृत्तीची घोषणा केली आहे.
"मागच्या 19 ते 20 वर्षांमध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्यासोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये खूप प्रेम मिळालं. भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी खूप नशीबवान आहे," असं म्हणत निलेश राणेंनी भाजपाचे आभार मानले आहेत.
"मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले. आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही. टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो," असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
नमस्कार,
मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही.
मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 24, 2023
15 व्या लोकसभेमध्ये निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून गेले होते.