Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा

Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. 

Updated: Jan 18, 2023, 01:32 PM IST
Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा  title=
Latest Political News in Marathi

Maharashtra Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात  (Nashik Graduate Constituency) अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाली. तसेच विधानपरिषदेसाठी (Legislative Council Election) कोणाला उमेदवारी द्यायची याची खळबतं सुरु आहेत. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. आज महाविकास आघाडीची आज दुपारनंतर पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News in Marathi)

पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती 

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार आहे. बैठकीत नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबतही अंतिम निर्णय होणार आहे. विधान परिषदेच्या पाच जागांमध्ये कोकण, नागपूर, नाशिक, संभाजीनगर आणि अमरावती या पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. 

शेवटच्या क्षणी नाशिकमध्ये काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर होऊनही डॉ. सुधीर तांबे यांनी अर्जच भरला नाही. तर त्यांचा मुलगा आणि  काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने मविआचा उमेदवारच नाही. त्यामुळे भाजपने डावललेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, नागपूरच्या जागेवरुनही गोंधळ झाल्याने नाशिकमधील उमेदवाराबाबत आघाडीतील काही नेत्यांची वेगळी मतं आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघामधून शिवसेनेकडून जाहीर पाठिंबा मिळालेल्या शुभांगी पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीमधील चूरस वाढली आहे. निडणुकीमधून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निघून गेल्यानंतर पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला नसल्याने आता त्यांची थेट लढत सत्यजित तांबे यांच्याशी (Satyajeet Tambe vs Shubhangi Patil) होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

काँग्रेसच्या पक्ष आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सत्यजित तांबे हे भाजप पुरस्कृत उमेदवार ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी देऊनही पुत्र सत्यजितसाठी पिता सुधीर तांबेनी माघार घेतली. दरम्यान, भाजपकडून अद्याप तांबे यांना पाठिंबा मिळालेला नाही. तसेच सत्यजित यांनी पाठिंबा मागितलेला नाही. दरम्यान, सत्यजित भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याने सस्पेन्स कायम आहे.