Devendra Fadnavis: "कधीकधी राजकारणातला एक 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो"

Devendra fadnavis Pune News: टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधून (Kusti) देखील कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच बघितलं आहे, असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चिमटे काढले आहेत.

Updated: Jan 15, 2023, 12:22 AM IST
Devendra Fadnavis: "कधीकधी राजकारणातला एक 'महाराष्ट्र केसरी' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो" title=
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis In Maharastra Kesari: पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये आज 65 वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी (Maharastra Kesari) स्पर्धा पार पडली. यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पैलवाल शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने पटकावला आहे. हा सामना पाहण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राजकीय कुस्तीचे डावपेच देखील सांगितले. (maharashtra kesari 2023 we also wrestle in politics devendra fadnavis statement in a public speech marathi news)

लाल माती आणि मॅटवरचे पैलवान कुस्ती खेळतात. खरं म्हणजे आम्ही देखील राजकारणात कुस्ती (Maharastra Politics) करतो. पण अलीकडच्या काळात आमची कुस्ती ही फक्त टीव्हीवरच्या स्क्रीनवर चालते, असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. टीव्हीच्या स्क्रीनवरच्या कुस्तीमधून (Kusti) देखील कधीकधी राजकारणातला एक महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण नुकतंच बघितलं आहे, असं म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) चिमटे काढले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणापेक्षा रंजक आणि आपल्या सर्वांना प्ररेणा देणारी अशाप्रकराची महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari 2023) स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाली. अत्यंत चुरशीच्या अशा दोन्ही उपांत्य फेऱ्या झाल्या. अंतिम सामना देखील चुरशीचा होईल, असंही फडणवीस म्हणाले आहेत. 

फडणवीसांची मोठी घोषणा 

आपण आपल्या कुस्तीगिरांना अत्यल्प मानधन देतो आणि गेल्या दोन वर्षापासून ते देखील बंद आहे. म्हणून, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक लेवलवर खेळतात. त्यांना केवळ 6 हजार रूपये मानधन दिलं जातो. मात्र, आता या मल्लांना 6 हजारवरून 20 हजार रुपये करण्याचा निर्णय करूया, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.