ब्रेकिंग: कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं; दुष्काळी भागात पाणी सोडलं

आधी सांगली, जत मधील ग्रामस्थांना कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांना पाणी सोडून कर्नाटकने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे एका दिवसात तिकुंडे येथील साठवण तलाव  ओव्हरफ्लो झाला आहे.

Updated: Dec 1, 2022, 06:17 PM IST
ब्रेकिंग: कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं; दुष्काळी भागात पाणी सोडलं title=

Maharashtra Karnataka Border Dispute, सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात(Maharashtra Karnataka Border Dispute) मोठा ट्विस्ट आला आहे.  कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं आहे.  कर्नाटकनं महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडलं आहे. कर्नाटकच्या पाण्यामुळे सांगलीतील जत तालुक्यातील तिकुंडे साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. 

सागंलीच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न पेटला आहे. जत तालुक्यातील उमदी, तिकोंडी, उमराणीपाठोपाठ सिद्धनाथ गावातले गावकरी आक्रमक झाले आहेत. 42 गावांमध्ये पाणी द्या अशी प्रमुख मागणी हे करत आहेत. त्यातच आता कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडलं आहे. 

आधी सांगली, जत मधील ग्रामस्थांना कर्नाटक मध्ये येण्याचे निमंत्रण आणि आता थेट दुष्काळी भागातल्या गावांना पाणी सोडून कर्नाटकने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे एका दिवसात तिकुंडे येथील साठवण तलाव  ओव्हरफ्लो झाला आहे.

जतमधील दुष्काळग्रस्तांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. जतमधील पाण्याबद्दल सकारात्मक तोडगा काढण्यासह तलावात तात्काळ पाणी सोडणं, शक्य तिथे टँकर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं शिष्टमंडळाच्या तुकाराम बाबा महाराज यांनी दिली. 

दरम्यान, सीमा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच कर्नाटक- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित बैठक होण्याची शक्यता आहे. कर्नाटक सीमा वादावर तयार करण्यात आलेल्या तज्ञ समितीचे प्रमुख खासदार धैर्यशील माने यांनी ही माहिती दिली.