Maharashtra : महाराष्ट्रात येवून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज

Maharashtra Border : तेलंगणा सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये अनुदान, 24 तास वीज, शेतीसाठी पाणी, शेतकरी आत्महत्या झाल्यास 5 लाख रुपये,  हमीभावा प्रमाणे शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकत घेणे या योजना राबवून दाखवाव्यात आपण पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही असे आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिले. 

Updated: Mar 26, 2023, 07:30 PM IST
Maharashtra : महाराष्ट्रात येवून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज title=

Maharashtra Border Issue :  शेतकऱ्यांसाठी तेलंगणात असलेल्या योजना राबवून दाखवा महाराष्ट्रात येणार नाही असे आव्हान तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. के. सी. आर यांची नांदेड मधील लोहा येथे सभा झाली. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर के सीआर यांनी दुसरी सभा नांदेड मध्येच घेतली. या सभेच्या माध्यमातून थेट महाराष्ट्रात  येवून   के. सी. आर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज दिले आहे (maharashtra politics).  दोन्ही राज्यातील पाणी प्रश्न महत्वाचा विषय आहे. पाणी प्रश्नावरुन दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. 

देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटले होते. त्यांनी आपण महाराष्ट्रात का येत आहात असा सवाल केल्याचे के सिआर म्हणाले. तेलंगणा सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये अनुदान, 24 तास वीज, शेतीसाठी पाणी, शेतकरी आत्महत्या झाल्यास 5 लाख रुपये,  हमीभावा प्रमाणे शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकत घेणे या योजना राबवून दाखवाव्यात आपण पुन्हा महाराष्ट्रात येणार नाही असे आव्हान त्यांनी फडणवीस यांना दिले. बीआरएस च्या या सभेला चांगली गर्दी झाली होती.

बी आरएसने नांदेड मध्ये एक सभा घेतली आणि महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली. ही भीती बीआरएस ची असल्याचे के चंद्रशेखर राव म्हणाले. पण 6 हजार नको एकरी 10 हजार रुपये द्यावे अशी मागणीही के सिआर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील आगामी सर्व जिल्हा परिषद निवडणूक लढणार - के चंद्रशेखर राव

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व निवडणुका बीआरएस लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली. गावागावात आपली ताकद दाखवा केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्या पाठीमागे येईल असे के सीआर म्हणाले. नांदेड जिल्ह्यातील 5 तालुक्यांच्या सीमा या तेलंगणाला लागून आहेत. सीमावर्ती भागातल्या नागरिकांना तेलंगणा मॉडेलची भुरळ पडलीय. त्याचाच फायदा घेण्यासाठी बीआरएस नांदेडमधून महाराष्ट्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत.