VIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग

Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला.  (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.  

Updated: Jul 23, 2021, 11:50 AM IST
VIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग title=

रत्नागिरी : Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला.  (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत. त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर पडणे शक्य झाले नाही. पुराचे पाणी रात्री शहरात घुसल्याने त्यांना सुरक्षित स्थळी जाता आले नाही आणि ते पाण्यातच अडकून पडलेत. 2005नंतर भयानक परिस्थिती निर्माण झाली. जीव वाचवण्यासाठी नाकरिकांनी प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न महापुरामुळे अपुरा पडला. हळहळू पुराचे पाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने नागरिक भितीच्या छायेखाली गेलेत. ते आजही कायम आहेत. त्यांना मदत मिळत नाही. काहींनी अडकल्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अपुरा पडला. एकाला बाहेर काढताना नागरिकांनी प्रयत्न केला पण तो पुराच्या पाण्यात पडला आणि एकच....

अत्यावश्यक सेवेसाठी संपर्क क्रमांक

 1)  चिपळूण तहसीलदार - 02355 295004
 
2) उपविभागीय अधिकारी चिपळूण - 02355 252046

3) चिपळूण नगरपरिषद -  02355 261047

4) चिपळूण पोलीस ठाणे  - 02355 252333
 
5) पोलीस नियंत्रण कक्ष - 02352 222222

6)जिल्हा नियंत्रण कक्ष - 02355 226248

दरम्यान, चिपळूणमध्ये पावसाच्या हाहाकाराची दाहकता दाखवणारा फोटो समोर आला आहे. चिपळूणला पुराच्या पाण्याने वेढा घातला आणि बघता बघता पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले इतकी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या मजल्यावर पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा सगळा प्रकार चिपळूणच्या ओक पेढीमध्ये समोर आला आहे. (Maharashtra flood)

चिपळूणमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे. एनडीआरएफ टीमकडून बचावकार्य वेगात सुरु आहे. (NDRF rescue operation started in Chiplun) नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. चिपळूणमध्ये हर्णै भागातून मच्छिमारांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. चिपळूणमध्ये प्रचंड पूरस्थिती आहे. शहराच्या विविध भागात एनडीआरएफच्या खांद्याला खांदा लावून मच्छिमारांनी बचावकार्य सुरू केले आहे. बोटी शहरात विविध भागात नेऊन मच्छिमारांनी नागरिकांची सुटका करायला सुरूवात केली आहे. 

चिपळूण शहरात दाखल होऊन पाण्यातून वार्तांकन करणारं 'झी २४ तास' हे एकमेव न्यूज चॅनेल असणार आहे. चिपळूण, खेर्डीत महापुराची परिस्थिती कायम आहे. पाऊस कमी झाला असला तरी पाण्याचा निचरा झालेला नाही. अनेक घरं अजूनही पाण्याखालीच आहेत. मदताकार्य पोहचू न शकल्यामुळे ठिकठिकाणी नागरिक अडकले आहेत. रस्त्यावर चिखल साचलाय. त्यामुळे मदतीसाठी जाणारी वाहनं पोहोचू शकत नाही. रस्ते पाण्याखाली गेल्याने चिपळूण आणि आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. काही टॉवरही पडलेत. वीज पुरवठा खंडीत झाला आहे.