बारामती : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर सातरमध्ये पोटनिवडणूक घ्यावी लागली. यामध्ये श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने जनतेने कौल दिला. उदयनराजेंनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील ही लढाई प्रतिष्ठेची बनली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारामध्ये सभा घेतली होती. धो धो पावसात पवारांच्या सभेची चर्चा राज्यभरात झाली. त्यानंतर उदयनराजेंचा दारुण पराभव झाला. यानंतर श्रीनिवास पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी तसेच सातारकर जनतेचे आभार मानण्यासाठी मी स्वत: जाणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. पण हा कार्यक्रम त्यांनी रद्द केला.
उदयनराजेंच्या पराभव करत निवडून आल्यानंतर शरद पवार हे स्वतःच सातारला जाऊन तिथल्या जनतेचे आभार मानणार होते. पण तिथे कोरेगाव मध्ये शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी तिकडे जाण्याचं टाळले. तेव्हा पाटील हेच बारामतीत पवारांना भेटण्यासाठी पोहोचले. सातारचे नवनियुक्त खासदार श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला आले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये ही भेट झाली.
शरद पवार हे सातारा येथे नुतन खासदार श्रीनिवास पाटील यांना भेटायला जाणार होते मात्र शशिकांत शिंदे यांचा विधानसभेच्या निवडणूकीत पराभव झाल्याने पवार यांनी सातारा जायचा निर्णय रद्द केला. त्यामुळे स्वतःहा खासदार श्रीनिवास पाटील हेच बारामतीत आपले जुने सवगंडी शरद पवार यांच्या भेटीला बारामतीत आले. यावेळी त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देवून अभिनंदन केल्यानंतर त्यांच्यात गप्पाचा फड देखिल आपसूक रंगला. यावेळी दोघांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे कॉग्रेसचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप, सारंग पाटील आणि पाटील यांचे जुने सवंगडी उपस्थित होते.