Maharashtra Din Atharva Sudame Raj Thackeray Reel: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतील हुतात्मा चौकातील स्मारकाला पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मात्र केवळ इतक्यावरच न थांबता राज ठाकरेंनी प्रसिद्ध रिलस्टार अर्थव सुदामेच्या सोबतीने मराठी तरुण-तरुणींना एक मोलाचा संदेश महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांच्याच आवडत्या माध्यमातून म्हणजेच रिलमधून दिला आहे.
अथर्व सुदामेने त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर महाराष्ट्र दिनानिमित्त एक विशेष व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्थवच्या ट्रेडमार्क 'स्थळ-पुणे' ऐवजी 'महाराष्ट्र माझा' असे शब्द दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये अथर्व आणि राज ठाकरे एकत्र गप्पा मारताना दिसत आहेत. एका छोट्या नाटुकल्याच्या माध्यमातून या दोघांनी तरुणाईला विशेष संदेश दिला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला अथर्व आपल्या मोबाईलमधून महाराष्ट्रासंदर्भातील काही माहिती वाचताना दिसतो. त्याचवेळी तिथे राज ठाकरे येतात आणि त्याला काय करतोय याबद्दल विचारपूस करतात. त्यावेळेस अथर्व त्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त आपण भाषणाची तयारी करत आहोत असं राज ठाकरेंना सांगतो.
राज ठाकरे अर्थव मोबाईलमधून वाचत असलेलं भाषण वाचण्यासाठी मागतात आणि त्यानंतर त्या भाषणा अर्थवने केलेल्या महाराष्ट्रातील दिग्गज मंडळीची नावं घेतात. त्यामध्ये टिळक, सावरकर, शाहु, फुले, आंबेडकर, पु.लं. देशपांडे, मंगेशकर, तेंडुलकर अशा दिग्गजांच्या नावाचा समावेश असल्याचं राज मोबाईल स्क्रीनवर पाहत म्हणतात. त्यानंतर ते अथर्वचं कौतुक करताना, 'वा छान उल्लेख आहेत. इतिहास, संस्कृतीबद्दल लिहिलं आहे,' असं म्हणतात. त्यानंतर अथर्व राज ठाकरेंना, यात काय बदल? असं विचारतो. त्यावर राज ठाकरे, "हे उत्तम आहे. पण आपण आज काय करतोय हे सुद्धा सांगण्याची गरज आहे. त्या त्या पिढ्यांनी त्यांचं त्यांचं कतृत्व गाजवलं आणि महाराष्ट्र मोठा केला. आज आपण असं काय करणार आहोत की ज्यातून महाराष्ट्र पुढे जाईल याचा विचार करण्याची गरज आहे," असं म्हणतात.
नक्की वाचा >> 'महाराष्ट्र दिन म्हणजे..', मोदींकडून मराठीत शुभेच्छा! म्हणाले, 'महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आमच्या..'
पुढे बोलताना राज ठाकरे, "मराठी भाषेत आपण बोललं पाहिजे. समोरचा हिंदी बोलल्यानंतर आपण वाहवत जाऊन हिंदीत बोलतो. पण त्याची काय गरज नाही," असं राज सांगतात. राज ठाकरेंचं हे म्हणणं ऐकून अथर्वही त्यांना अनुमोदन देत, "खरं आहे साहेब, जॅक अॅण्ड जिलऐवजी ससा ओ ससा कापूस जसा हे शिकवणं गरजेचं आहे. बाहात्तर आणि अठ्ठेचाळीस म्हणणं आणि वापरता पण आलं पाहिजे. आपण येत नाही म्हणून वापरत नाही आणि त्याची गरज पण पडत नाही," असं म्हणतो.
नक्की वाचा >> रविवारीच Week Off का? भारतीय कामगारांना ही हक्काची सुट्टी मिळवून देणाऱ्या मुंबईकराची गोष्ट!
"अभिमान, स्वाभिमान टिकवणं आणि तो आपल्याकडून मराहाष्ट्राला खारीचा वाटा म्हणून देणं आज गरजेचं आहे," असं म्हणत राज ठाकरे अथर्वला शुभेच्छा देतात.
या रिलच्या शेवटी राज जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं वाजत आणि रिल संपतो. या रिलवर अनेकांनी उत्तम संदेश दिल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडीओ राज ठाकरेंच्या मुंबईमधील 'शिवतिर्थ' या निवासस्थानी शूट करण्यात आल्याचं दिसत आहे.