उद्धव ठाकरेंच विठुरायाला साकडं

'विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे.'  

Updated: Jun 28, 2020, 02:35 PM IST
उद्धव ठाकरेंच विठुरायाला साकडं title=

मुंबई : महाराष्ट्रात आषाढी एकादशी सण मोठ्या उत्साहत साजरा करण्यात येतो. परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्व सण घरच्या घरी साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वधर्मीयांचे आभार मानले.  'विठुरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे. संपूर्ण जगावर आलेलं हे संकट दूर व्हाव म्हणून विठुरायाच्या चरणी साकडं घालणार आहे.' सर्वांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचं संकट दूर घालवण्यासाठी विठुरायाच्या चरणी साकडं घालणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी १.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

'याआधी मी हेलिकॉप्टरमधून वारी पाहिली आहे. परंतु आता मुख्यमंत्री म्हणून आणि तुमचा प्रतिनिधी म्हणून वारीला जाणार आहे. हेलिकॉप्टरमधून मी विठ्ठलाचं विश्वरूप पाहिलं आहे. विठुरायाने आतापर्यंत अनेक संकटांमधून आपल्याला बाहेर काढलं. आता देखील कोरोनाच्या संकटातून तो आपल्याला बाहेर काढेल.' असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी हे सरकार काळजीवाहू सरकार नसल्याचं देखील वक्तव्य केलं. 'आपलं सरकार काळजीवाहू नाही. हे सरकार महाराष्ट्राची काळजी घेणार आहे. धोक्यापासून सावध करण्यासाठी हे सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं.