Shivsena 2 Candidate Not Reachable : विधानसभा निवडणुकीला एक महिना शिल्लक आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करुन प्रचाराला सुरुवात केली आहे. पण उमेदवारीवरुन सर्वच पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे.
ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे उमेदवार नॉट रिचेबल आहेत. नाशिकच्या देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून धनराज महाले आणि देवळाली मतदारसंघातून राजश्री अहिरराव यांना उमेदवारी मिळालीये. राष्ट्रवादीचे दिंडोरीतील उमेदवार नरहरी झिरवाळ आणि शिवसेनेच्या धनराज महालेंमध्ये थेट लढत होणार आहे.
तर देवळालीत राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे आणि शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांच्यात थेट लढत होणार आहे.
उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.महायुतीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होणारे. मात्र त्याआधीच शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाल्याने मोठा ट्विस्ट आलाय.तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं टेन्शन वाढलंय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये एका बॅनरची चर्चा रंगलीये.नाशिक शहरात अज्ञातांनी हे बॅनर्स लावलेत.. अन्याय झाला की गप्प बसायचं नसतं, म्हणून तुमच्या भेटीला येते तुमची लाडकी बहिण असा मजकूर या बॅनरवर आहे.. आता हे बॅनर नेमके निवडणुकीसाठी झळकावलेत की भाउबिजेच्या पार्श्वभूमीवर हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.
मुंबईतील चेंबूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार तुकाराम काते यांच्याकडून महिला मतदारांना साडीवाटप करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून करण्यात आलंय...शिवसेनेचे कार्यकर्त्यांना साडीवाटप करताना रंगेहाथ पकडल्याचा ठाकरे पक्षाने दावा केलाय..ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून आचारसंहिता भंग झाल्याने तुकाराम काते यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.