तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...'

Sadabhau Khot Slams Ajit Pawar: शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केल्याने खवलेल्या अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता सदा भाऊ खोत यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2024, 03:10 PM IST
तेव्हा तोंडाला कुलूप लागलं का? सदाभाऊ खोतांचा अजित पवारांना सवाल; म्हणाले, 'NCP च्या गुंडांनी...' title=
अजित पवारांनी केलेल्या पोस्टवरुन टीका

Sadabhau Khot Slams Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवारांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित दादांनी देखील खोत यांच्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र नमतं घेण्याऐवजी खोत यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत आता अजित पवारांनाच थेट आव्हान दिलं आहे. त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांसह विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत.

नेमका वाद काय?

रयत शेतकरी संस्थेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी बुधवारी सांगलीमधील जत येथे आयोजित महायुतीच्या सभेत बोलताना शरद पवारांवर नको त्या शब्दांमध्ये टीका केली. “अरे पवार साहेब, तुमच्या चिल्यापिल्याने कारखाने हाणले, बँका हाणल्या, सुतगिरण्या हाणल्या, पण पवारांना मानावं लागेल, एवढं घडलं तरी सुद्धा भाषणात म्हणतं, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? तुला कसला चेहरा पाहिजे?”, असा एकेरी उल्लेख करत खोत यांनी शरद पवारांवर टीका केली.

नक्की वाचा >> 'नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी...', राज ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कितीवेळ बाहेर...'

अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

विरोधक असले तरी आपल्या काकांबद्दल केलेलं हे विधान अजित पवारांना भावलं नाही. त्यांनी थेट सोशल मीडियावरुन आपली नाराजी व्यक्त केली. 'ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका  केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही," अशी पोस्ट अजित पवारांनी शेअर करत आपला विरोध नोंदवला.

नक्की वाचा >> Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

तेव्हा तुमच्या तोंडाला कुलूप लागले होते का?

अजित पवारांच्या या टीकेवर आता सदाभाऊ खोत यांनी कठोर भूमिका घेत त्यांनाच उलट सवाल केला आहे. "माझ्या टिकेनंतर सगळे प्रस्थापित आता खवळून उठले आहेत. कोण ट्वीट करू लागलेत, कोण आंदोलन करू लागलेत पण ट्वीट काय करताय? आभाळावर मोठ्या अक्षरात विरोध करा," असा खोचक टोला खोत यांनी अजित पवारांसहीत त्यांच्या या विधानावरुन विरोध करणाऱ्यांना लगावला आहे. "2002 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी माझं अंग सोलून काढलं त्यावेळी तुमचे ट्वीटर बंद पडले होतं का? फेसबुक चालत नव्हतं का? तेव्हा तुमच्या तोंडाला कुलूप लागले होते का?" असा सवाल करत खोत यांनी, "आमचा जन्म आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधात आहे," असं नमूद केलं आहे.

नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

तसेच, "वाडयांनी गाव गाड्याच्या नादाला लागू नये," असं इशारा देखील यावेळी सदाभाऊ खोतांनी अजित पवारांसहीत सर्वच विरोधकांना आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x