अनिरुद्ध दवाळे, अमरावती : राज्यात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. अमरावतीत (Amravati) पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा कहर दिसून येत आहे. अमरावती महानगर पालिकेत काम करणारे 80 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (AMC Employees Found Coronavirus Positive) असल्याचे आढळले आहे. त्याचवेळी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 5 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती महानगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल आहे. 80 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अमरावती महानगर पालिकेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात डॉक्टर आणि अभियंत्यांसह सर्व पदांवर काम करणारे लोक समाविष्ट आहेत. अमरावती महानगर नगरपालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 3,000 असल्याचे सांगण्यात आहे. याशिवाय खासगी स्वरुपात काम करण्यासाठी कर्मचारीही कामावर घेण्यात आले आहे.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असतानाच दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. अमरावती विद्यापीठात मागील आठवड्यात तीन दिवस कर्मचार्यांची सामूहिक कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर आता त्याचा अहवाल समोर आला आहे. यात विद्यापीठातील तब्बल 45 कर्मचारी तर त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही असे एकूण 59 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
अमरावती जिल्हा दंडाधिकारी प्रशासकीय कार्यालयात 60 हून अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. (Amravati's DM Office) कार्यालायत काम करणारे 60-65 कर्मचारी देखील कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह असल्याची नोंद झाली आहे. अमरावतीच्या डीएमच्या कार्यालयात काम करणाऱ्या एकूण कर्मचार्यांची संख्या 200 आहे. अमरावती विद्यापीठात 56 कर्मचारी संक्रमित आढळल्यानंतर कोरोना-संक्रमित रुग्णांना अलग ठेवण्यात आले आहे.
अमरावतीत वेगाने वाढणार्या कोरोना विषाणूच्या घटना लक्षात घेता अमरावतीत दोन आठवड्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 8 मार्चपर्यंत अमरावतीत डाळेबंदी सुरूच राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल. गुरुवारी अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचे 673 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 9 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला.