अमरावती : BJP bandh turns violent: त्रिपुरामधील घटनेचे लोण महाराष्ट्रात पसल्याचे दिसून येत आहे. नाशिक मालेगाव, नांदेड आणि अमरावतीत पडसाद उमटलेत. आज अमरावतीत बंद दरम्यान काही दुकानांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली होती. भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले होते. या बंदला हिंसक वळण लागले. मात्र, भाजपने महाविका आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. (Maha Vikas Alliance government responsible for Amravati violence - BJP)
अमरावती हिंसाचारासाठी भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत आहे. तपास यंत्रणा काय करत होत्या, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. तर अमरावतीतील हिंसाचारावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील मोर्चे हे सुनियोजित षडयंत्र असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. तर या प्रकरणी सरकारने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अमरावतीमध्ये दुकानं फोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दंगली घडवण्यामागे भाजपचा हात असल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्याचं त्यांनी खंडन कंले असून बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी राऊत यांच्या थोबाडीत मारली असती, असे ते म्हणालेत.
महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी ही दंगल घडवून आणली आहे. दंगली घडवणं हा भाजपचा हातखंडा आहे. राज्य चालवता येत नाही म्हणून भाजपकडून दंगली घडविण्यात येत आहे, असा थेट आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करत दोषींवर सरकार कठोर कारवाई करेल, असे सांगितले. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकून यांनी शांततेचे आवाहन केले आहे. परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मीडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्व जण घेऊया, असे त्यांनी ट्विट केले आहे.