सोलापूरात पार्क मैदानावर पार पडला माघ वारी रिंगण सोहळा

सोलापुरातल्या पार्क मैदानावर मोठ्या उत्साहात माघ वारी रिंगण सोहळा पार पडला. त्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

Updated: Jan 24, 2018, 04:47 PM IST
 title=

सोलापूर : सोलापुरातल्या पार्क मैदानावर मोठ्या उत्साहात माघ वारी रिंगण सोहळा पार पडला. त्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

'ज्ञानोबा-तुकोबाच्या जयघोषात वारक-यांनी माघी यात्रेसाठी पंढरपुराकडे प्रस्थान ठेवलं. गेल्या सात वर्षांपासून सुरु झालेल्या रिंगण सोहळ्यात अश्वांबरोबर ध्वजधारी, मृदंग-टाळकरी आणि जलकुंभधारी महिला, वीणेकरी सहभागी झाले होते.

मार्कंडेय मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखीचं पूजन करण्यात आलं.  या पालखी सोहळ्यात शहर व जिल्ह्यातून ९८ दिंड्यांचा सहभाग होता. पार्क मैदानावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते माऊलींच्या अश्वाचे पूजन करण्यात आलं. मग पालखीनं पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं.