तुमची मुलंही शाळेत जातात का? मग हातातली कामं सोडून ही बातमी पाहा

शाळेतून तुम्ही-आम्ही थेट घरी यायचो, ही पोरं दररोज करतात हमरी-तुमरी...पाहा Video

Updated: Sep 16, 2022, 04:39 PM IST
तुमची मुलंही शाळेत जातात का? मग हातातली कामं सोडून ही बातमी पाहा title=

लोणावळा : शाळेत जाऊन विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य घडवावं अशी पालकांची साधी आणि सर्वसाधारण अपेक्षा. पण, विद्यार्थांकडून मात्र ही अपेक्षा धूळीस मिळताना दिसत आहे. कारण, त्यांची मुलं शाळेत तर जातायत, पण सुखरुप घरी परत येतील की नाही अशी चिंता पालकांमध्ये निर्माण झाली आहे. कारण ठरतंय ते म्हणजे या विद्यार्थ्यांचा हुल्लडबाजपणा.

पालकांच्या मनात नेमकी चिंता का वाढतेय, याचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. तुमची मुलं शाळेत जात असतील, तर व्हिडीओ पाहून तुम्हीही विचलित व्हाल. हा Free style हाणामारीचा प्रकार लोनावळ्यातील शाळेबाहेर दररोज पाहायला मिळतोय.

 

(Lonavla) लोणावळ्यातील व्हीपीएस (VPS School) शाळा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. कारण, इथं शाळा सुटल्यावर दररोज तुंबळ हाणामारी होते. इथं कोण गुंड वगैरे येत नाही, तर इथले विद्यार्थीच या थराला पोहोचताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये (Students Video) आधी शाब्दिक बाचाबाची होते आणि नंतर या बाचाबाचीला वेगळं स्वरुप मिळून सुरु होते ती हाणामारी. असा प्रकार अजही रोज होत असल्याने शाळेबाहेरील नागरिकही प्रचंड वैतागले आहेत. त्याचबरोबर, शोळेत गेलेला आपला मुलगा शाळा सुटल्यावर सुखरुप घरी येईल की नाही अशी चिंता पालकांमध्ये पाहायला मिळतेय. या प्रकाराला आणखी वेगळं वळण येऊन काही मोठी घटना घडण्याआधीच पोलिसांनी हस्तक्षेप करायला हवा अशी मागणी नागरिक आणि पालकांकडून जोर धरताना दिसतेय.

व्हीपीएस शाळेबाहेर घडणारा हा प्रकार विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याला काळीमा फासणारा आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आयुष्याचं जगण्याचे धडे शिकवले जातात पण याचा विद्यार्थ्यांच्या जीवनात कितपत परिणाम होतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेचं प्रशासन आणि (Police) पोलीस प्रशासन या प्रकरणाला काही तोडगा काढतील अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आणि शाळेच्या आवारातील नागरिकांमध्ये असल्याची दिसून येतेय.