Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का बसलाय. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय.   

नेहा चौधरी | Updated: Jun 4, 2024, 06:10 PM IST
Baramati Loksabha Nivadnuk Nikal 2024 : बारामतीत अजित पवारांना धक्का! नणंद - भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय  title=
loksabha nivdnuk nikal 2024

Baramati Lok Sabha Election Results 2024 :  महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई बारामती मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसलाय. बारामतीत पवार विरुद्ध पवार अशा या सामनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule)  तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या एकमेकांसोबत उभ्या होत्या. नणंद - भावजयच्या या लढतीमध्ये नणंदने बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे 1 लाख 53 हजार 048 मतांनी विजयी मिळवलाय.

शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी बारामतीमधील लढत ही प्रतिष्ठेची होती. गेल्या निवडणुच्या तुलनेत यंदा मतदानात घट झाली असली तरी बारामतीकरांनी 59.50 टक्के मतदान केलं. गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये भाजपचे राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळेंच्या विरोधात रिंगणात उभा ठाकल्या होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी कांचन यांना 1 लाख 30 हजार मतांनी पराभव केला होता. 

तुमचा खासदार कोण? - Maharashtra Lok Sabha Winner List: महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; वाचा एकाच क्लिकवर

तर 2014 मध्ये सुप्रिया सुळे यांनी महादेव जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव केला होता. पण यंदा बारामतीचं चित्र खूप वेगळं होतं. इथे पवार विरुद्ध पवार म्हणजे पवार कुटुंब एकमेकांसमोर उभे ठाकले होते. काका पुतण्याची प्रतिष्ठा आणि नंदन भावजय यांची लढत देशाने पाहिली. अजित पवारांच्या बंडखोरीमुळे बारामतीकर काय कार्यकर्तेही कोणाचा प्रचार करायचा यामुळे संभ्रमात होते. 

बारामतीमधील ही लढत पवार कुटुंबासाठी जेवढी प्रतिष्ठेची होती तेवढीच राजकीयदृष्ट्या ती महत्त्वाची होती. त्यामुळे अख्ख पवार कुटुंब प्रचारात उतरलं होतं. कोणी नंनदेच्या पाठीशी उभं होतं तर कोणी सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करत होते. बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी लढत पाहिला मिळाली. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून चौथ्यांदा खासदारकीचा मान पटकावलाय. 

ही लढत भावनिक झाली होती. मागील तीन टर्म लेकीला निवडून दिले. आता सुनेकडे नेतृत्व आले की फिट्टमफाट होईल, असा टोला अजित पवार यांनी शरद पवारांना लगावला होता. त्या टीका उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक आहे. 

लोकसभा निवडणुकीचा निकालनुसार बारामती ही शरद पवारांचीच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. 6 वेळा शरद पवार खासदार आणि आता लेक सुप्रिया सुळे चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत.