'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'

LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला.   

शिवराज यादव | Updated: Apr 28, 2024, 12:59 PM IST
'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...' title=

LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला. मनोज जरांगे सध्या गिनतीतही नाही. बेडकासारखं फुगायचं काही कारण नाही अशी टीका त्यांनी केली आहे. 

छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख करत म्हटलं की, "मनोज जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता आहे ना. त्या जरांग्याला हिंदुस्तान घाबरलाय. काहीही बडबड करतो. त्याची अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतो. नाशकात येऊन बोलतो ती ओपन ची जागा आहे, ओबीसीने लढू नये. त्याला इतकंही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत, लोकसभेत आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथून निवडून येतो. समीरभाऊ सुद्धा ओबीसी असून इथूनच खासदार म्हणून निवडून आले. त्याला आता आपण काय सांगायचं".

"तो तर असं पण बोलला होता की, नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही. आता नरेंद्र मोदींच्या केवढ्या जंगी सभा होतात. तो सध्या गिनतीतही नाही. उगाच बेडकासारखं फुगायचं काही कारण नाही," असा टोलाही मनोज जरांगे यांनी लगावला आहे.  

पूनम महाजन यांना उमेदवारी डावलण्यावरुन भुजबळ म्हणाले की, "हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असून त्यांना विचारायला पाहिजे. पण उज्ज्वल निकम उत्कृष्ट असे वकील आहेत. राज्याच्या देशाच्या विरोधातील दहशतवाद्यांविरोधात मेहनतीने, यशस्वीरित्या त्यांनी कोर्टामध्ये बाजू मांडली आहे. त्यांनासुद्धा धोका निर्माण झाला. पण पर्वा न करता त्यांनी देशसेवा केली. कदाचित त्याचं बक्षीस दिलं गेलं असेल".