NDAचे 'ते' दोन खासदार निवडून आलेच पाहीजेत, उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन

Uddhav Thackeray On Narendra Modi: सोलापुरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.

Pravin Dabholkar | Updated: Apr 29, 2024, 09:32 PM IST
NDAचे 'ते' दोन खासदार निवडून आलेच पाहीजेत, उद्धव ठाकरेंनी केलं आवाहन title=
Uddhav Thackeray On Nakali Shivsena

Uddhav Thackeray On Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी उद्या धाराशीवला जात आहात. तेव्हा तुम्ही भवानी मातेचं दर्शन घ्याव. दर्शन नाही घेतलात तर नाव तरी घ्या.  भाषणाची सुरुवात भवानी मातेचं नाव घेऊन करावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जर तुम्ही भवानी मातेचे नाव घेतले नाही तर तुम्हाला जनता महाराष्ट्रद्वेषी समजेल. आणि भवानी मातेचे नाव घेतलात तर निवडणूक आयोग काय कारवाई करते हे आम्ही पाहू, असे ते म्हणाले. सोलापुरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

शिवसेना होती म्हणून मोदी पंतप्रधान होऊ शकले. कळकट हात मोदींना बळकटीसाठी पाहीजे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही, अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदींवर केली. वापरायचं आणि फेकून द्यायच ही भाजपची नीती आहे. शांतिगीरी स्वामींच्या मतांचाही त्यांनी वापर केला. आता स्वामीजींनी त्यांना श्राप द्यावा, असे ते म्हणाले. घटना बदलायचा प्रयत्न केल्यास संपूर्ण देश पेटून उठेल.  4 जूनपर्यंत थांबा. ईडी, सीबीआय आपल्या हातात असेल. तसेच मशाल हातात घेऊन तुतारी फुंकणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 

 भाजप 2 खासदार होते. पण त्याचे 300 खासदार झाले. दोनाचे 300 खासदार तुम्हीआम्ही जनतेने केले. आता 2 खासदार निवडून आलेत पाहिजेत. बाकी सभागृहात आपले सगळे इंडिया आघाडीचे खासदार असतील, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. 

मोदींनी कोरोना काळात लस दिली म्हणून आपण जिवंत आहोत. असे ते म्हणतात. मोदींनी लस बनवली मग संशोधक काय गवत उपटत होते का? असे ते म्हणाले.  महाराष्ट्राच्या सरकारी यंत्रणेने गावागावात जाऊन लस पोहोचवली. त्यावेळी देशात 1 नंबरचा मुख्यमंत्री म्हणून माझा गौरव झाला. पण तो तुमचा गौरव होता. मी जे सांगितलं ते तुम्ही ऐकलंत. मोदीजींची लस नंतर आली. लस मिळवण्यासाठी सरकारला केंद्राकडे खूप विनवण्या कराव्या लागल्या. पण केंद्र म्हणायचं आधी इकडे-तिकडे देऊद्या.

कोणाच्या खात्यात 15 लाख आले नाहीत पण भाजपच्या खात्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये आले. कोर्टाने घोटाळा उघड केला नसता तर आणखी घोटाळा झाला असता. कोरोना काळात पीएम फंडचा घोटाळा केला, असे ते म्हणाले.