Sanjay Raut On Opposition Unity: महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्ष उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेससहीत इतर मित्रपक्ष आज मुंबईमध्ये संयुक्त पत्रकारपरिषद घेणार आहेत. यापूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट उल्लेख न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात उभ्या असलेल्या विरोधकांची एकजूट कायम राहील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. "महाराष्ट्रात एकजूट कायम राहील आणि 35 पेक्षा जास्त जागा जिंकू. काही लोकांचा मिशन असतं 48 च्या 48 जागा जिंकून. 45 जागा जिंकू असं आमचं नाही. पण आम्ही 35 पेक्षा नक्कीच जास्त जागा जिंकू. मग त्या 40 असतील किंवा 42 ही असतील. मात्र 35 च्या पुढे नक्की," असा विश्वास राऊत यांनी बोलून दाखवला. तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी पत्रकार परिषद होत असल्याचा मुद्दा उपस्थित करुन एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला.
"आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. आजच्या दिवसाला आपल्या कॅलेंडरमध्ये असो किंवा आपल्या जीवनात तसेच आपल्या संस्कृतीत फार महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे साडेतीन शहाणे आपल्याला दिसत आहेत. त्या साडेतीन शहाणेंना आव्हान देण्यासाठी आम्ही आजचा दिवस निवडला आहे," असं राऊत म्हणाले. तसेच अर्धा शहाणा कोण आहे हे आपण नंतर सांगू असंही राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत तर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असं आमचं मत आहे, असंही राऊत म्हणाले. "ज्या अर्थाने आम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद घेत आहोत. त्या अर्थाने आमच्या दृष्टीने कोणताही वाद उरलेला नाही. असं काही वाटलं तर आम्ही एकत्र बसून चर्चा करु. आघाडीमध्ये एखाद दुसऱ्या जागेवर शेवटपर्यंत चर्चा होत असतात. अनेक वर्ष काम करताना कार्यकर्ते एकत्र येऊन काम करतात. सांगली असो किंवा भिवंडी असो तिथेही असाच प्रकार आहे," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> 'विरोधीपक्षाच्या उमेदवाराला भेटूही नका', अजित पवार असं का म्हणाले? इशारा देत म्हटले, 'गप्पा..'
"विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या भावानांशी मी सहमत आहे. सांगली, रामटेक, भिवंडी, कोल्हापूर येथील शिवसैनिकांच्या भावनांशी मी सहमत आहे. मात्र देशातील हुकूमशाहीशी लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात की गोष्टींचा त्याग करावा लागतो," असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागेवर चर्चा होत आहेत, असंही राऊत म्हणाले. काही जागांवर अगदी शेवटपर्यंत चर्चा सुरु राहतात असं आघाडीच्या सरकारची मोट बांधताना अनेकदा होतं, असंही राऊत म्हणाले.
"आचारसंहितेमध्ये कोणीही पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री नसतो. वर्षावरील बैठका हा आचारसंहितेचा भंग आहे. संविधान न मानणारेच आचारसंहितेचा भंग करु शकतात. ही अधर्माविरुद्ध धऱ्माची लढाई.
उद्धव ठाकरे, शरद पवार ठाममपणे उभे. मोदी आचारसंहितेचे उघ्लंन करत आहेत," असा आरोप राऊत यांनी केला.
नक्की वाचा >> '...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन
"मोदींना उद्धव ठाकरेंची आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची भीती वाटते. महाराष्ट्रात मोदी विरुद्ध ठाकरे असा सामना आहे. मोदी जिथे जातील तिथे भाजपाच्या जागा कमी होणार. दडपशाही करुन उद्धव ठाकरे दिपस्तंभसारखे उभे आहेत," असंही राऊत म्हणाले.