लोकसभा निवडणूक २०१९: कोण ठरणार प्रभावी युवा नेता?

महाराष्ट्राचा भावी नेता कोण ?

Updated: Mar 12, 2019, 07:21 PM IST
लोकसभा निवडणूक २०१९: कोण ठरणार प्रभावी युवा नेता? title=

मुंबई : लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत अनेक पक्षांनी युवा नेत्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. महत्त्वाचे म्हणजे अगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला युवा नेत्यांकडून जास्त फायदा होऊ शकतो. यामुळे युवा नेत्यांना संधी देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना पक्षाने पुढाकार घेतला आहे. भाजप सुजय विखे-पाटील, शिवसेना अदित्य ठाकरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्थ पवार यांना उमेदवारी देणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. अगामी लोकसभा निवडणुकीत कोण सर्वात प्रभावी युवा नेता ठऱणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सुजय विखे-पाटील

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. अहमदनगरमधून सुजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नगर, नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात विखे पाटील घराण्यांचे प्रस्थ आहे. त्यामुळे भाजप सुजय यांना उमेदवारी देईल असे सांगण्यात येत आहे. ही घटना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असली तरीही विधानसभेत भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत सुजय यांनी म्हटलं की, राष्ट्रीय सुरक्षतेच्या बाबतीत भाजप सरकारने घेतलेले निर्णय मला आवडले. त्यामुळे भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे योग्य असल्याचेही ते म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधोरात प्रचार करणार का? यावर त्यांनी म्हटलं की, ते कोणत्याही पक्षाच्या विरोधात प्रचार करणार नसून, भाजपचा प्रचार करणार आहेत. गरज पडल्यास मुलगा म्हणून मी वडिलांच्या मागे ठामपणे उभा राहिल. तसेच त्यांच्यामुळे वडिलांना काही समस्या निर्माण झाली तर वडिलांना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांची असेल.' असेही ते म्हणाले.

पार्थ पवार

मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. आता त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे उपस्थित होते. या बैठकीत पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पार्थला उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं नेत्यांचं मत आहे. त्यामुळेच पक्षाकडून पार्थ पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती आहे.

या मतदारसंघात पार्थ पवार यांची उमेदवारी पुढे येण्याची अनेक कारणं आहेत. मुख्य कारण म्हणजे या ठिकाणाहून राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नाही. तसंच या मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडसह मोठ्या भागात अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली.

अदित्य ठाकरे

ठाकरे कुटुंबातून आजपर्यंत कुणीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र, याआधी आदित्य ठाकरेंनी मुंबई जिल्हा फुटबॉल असोशिएशनची निवडणूक फक्त लढवलीच नाही तर जिंकलीसुद्धा... त्यामुळे, आदित्य लोकसभा निवडणुकीला उभे राहणारे ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अदित्य ठाकरे हे २०१० पासून युवासेनेची जबाबदारी योग्यरितीने पार पाडताना दिसत आहेत. पण शिवसेनेने याला अजून कोणताही दुजोरा दिलेला नाही. संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळले आहे.