लोकसभा निवडणूक २०१९: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम
२९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
Updated: Mar 28, 2019, 08:36 PM IST
शिर्डी : पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदार संघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. दिवंगत काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी या मतदार संघाचं ९ वेळा खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय. मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसुचीत जातीं साठी राखीव झाला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता.
शिवसेनेने आता सदाशिव लोखंडे यांना, काँग्रेसनेभाऊसाहेब कांबळे यांना तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. अरुण साबळे यांना उमेदवारी दिली आहे. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१४ चा निकाल
२०१४ च्या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा १,९,९२२ मतांनी पराभव केला होता. २००९ च्या निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेत असताना भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय झाला होता.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.