यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? या प्रश्नाचे उत्तर नाहीच असे आहे. दरम्यान, सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ या जिल्ह्यात दाभडी या गावात करण्यात आल्यात. याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे येथील जनतेला मोठा 'विकास' होईल असे स्वप्न दाखविण्यात आले. 20 मार्च 2014 रोजी दाभडी या गावात मोठा गाजावाजा करत भाजपने येथे 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जनतेशी आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. मोठ मोठी आश्वासने दिलीत. तुम्हाला अच्छे दिन पाहायला मिळतील, असे जाहीर केले. या गोष्टीला आता पाच वर्षे होऊन गेलीत. मात्र, मोदींनी दिलेली एकही गोष्ट या गावतात फेरफटका मारल्यानंतर दिसली. 'झी 24 तास'ने या गावाला भेट दिली. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी येथील जनतेशी थेट संवाद साधला. त्यावेळी येथील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी मोदींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ आम्हाला पोकळ आश्वासन मोदी यांनी दिले. जसं गाव पाच वर्षांपूर्वी होते तसंच गाव आहे. ना गावाचा कायापालट झाला ना विकास, असे येथील त्रस्त जनता सांगत आहे.
28 मुद्द्यावर चर्चा केली. कापूस हे पांढेरे सोने आहे. कापड तयार करण्यासाठी सूत कारखाना काढण्याचे सांगितले. मात्र, काहीही झाले नाही. सोयाबिन पिक आहे. येथे सोयाबिनची भुकटी करण्यासाठी कारखाना उभारण्याचे आश्वासन दिले. मात्र, यातील एकही आश्वासन मोदीसाहेबांनी पूर्ण केलेले नाही. जनतेची केवळ निराशाच त्यांनी केली आहे. मोदींनी वर्षाला सहा हजार रुपये खात्यात जमा करणार आहेत. जर कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रत्येकाला दिवसाला साडेतीन रुपये मिळतील. आम्ही काय लाचार आहोत का? भिकारी कोणी आले तर त्याला आम्ही 10 रुपये देतो आणि मोदी साडेतीन रुपये. म्हणजे याचा अर्थ काय? किती शेतकरी लाचार आहेत, हेच दाखविण्याचे प्रयत्न केले. येथील खासदार आणि आमदार येथे फिरकत नाही. काहीच काम करत नाहीत, अशी नाराजी येथील नागरिकांनी व्यक्त केले.
मोदींच्या कामावर महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापुढे मोदी सरकार आम्हाला येथील जनतेला नको आहे. कारण केवळ विकासाचे आश्वासन दिले. काम तर काहीच केलेले नाही, अशी खंत येथील महिला वर्गातूनही व्यक्त करण्यात आली. दाभडी येथे आजही आंधार आहे. दाभडी गावात काय परिस्थिती हे देखील कोणी पाहायला आलेले नाही. हंसराज अहिर यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले. मात्र, ते त्यानंतर या गावात आलेले नाहीत. मोदी आले आणि गावाचा डंका पिटला गेला. मोदी येऊन गेल्यानंतर 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केला. मात्र, आज या गावाची स्थिती बिकट आहे. ना शेतकऱ्याचे प्रश्न सुटले. ना गावात कोणतीही चांगली योजना आलेली नाही. जसं गाव पाच वर्षांपूर्वी आहे तसंच आजही आहे, असे येथील शेतकरी, गावकरी आणि महिला सांगतात.
मोदींचा 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रमच बोगस आहे. कारण त्यांनी येथे येवून चर्चा केली मात्र, काम काही केलेले नाही. केवळ आश्वासनापलिकडे काहीही दिलेले नाही, असे येथील संतप्त नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली