नांदेड आणि सोलापुरच्या नवरदेवांनी लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानास देशभरात सुरूवात 

Updated: Apr 18, 2019, 10:31 AM IST
नांदेड आणि सोलापुरच्या नवरदेवांनी लग्नाआधी बजावला मतदानाचा हक्क  title=
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानास देशभरात सुरूवात झाली आहे. नांदेडमध्येही मतदार मोठ्या संख्येत आपला हक्क बजावला आहे.  राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसने त्यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर हे अशोक चव्हाणांच्या विरोधात उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून यशपाल भिंगे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
 
नांदेड पाठोपाठ सोलापूरमध्येही एका नवरदेवांनी 'आधी मतदान मग लग्न' हा संदेश दिला आहे. आम्ही नवरीलाही आधी मतदान करुन येण्यास सांगितल्याचे नवरदेवाच्या आईने 'झी 24 तास'ला सांगितले.

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ साली नांदेडच्या मतदारसंघातून अशोक चव्हाण विजयी झाले होते. राज्यात काँग्रेसने जिंकलेल्या २ जागांपैकी ही एक जागा होती. अशोक चव्हाण यांनी भाजपच्या डी.बी. पाटील यांचा ८१,४५५ मतांनी पराभव केला होता. 
 

२०१४ निवडणुकीची आकडेवारी 

उमेदवार                       पक्ष                       मिळालेली मतं
अशोक चव्हाण              काँग्रेस ४,९३,०७५
डी.बी.पाटील                  भाजप                    ४,११,६२०
राजरत्न आंबेडकर          बीएमयुपी               २८,४४७
हंसराज वैद्य                 बसपा                      २२,८०९
फिरोज खान गाझी          अपक्ष ८,०८८