कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राकडे - अजित पवार

राज्यात कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला आहे.  

Updated: May 1, 2021, 10:04 AM IST
कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राकडे - अजित पवार title=
संग्रहित फोटो

पुणे : राज्यात कोरोना विषाणूचा धोका वाढला आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला आहे.  15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊन लावला आहे. दरम्यान, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीने काळजी घेत आहोत. आपण तयारी करतोय. मात्र, लस कमी पडत असल्याने लसीकरणाला थोडी खीळ बसत आहे. केंद्र सरकारने लस देण्याचा पूर्ण अधिकार आपल्या हाती घेतला आहे, अशी टीका करत लसीचे उत्पादन लक्षात घेता परदेशातील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का, याबाबत विचार सुरु आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

आज महाराष्ट्र आणि कामगार दिन आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हिरक महोत्सवी वर्ष असूनही कोरोनामुळे आपण साजरे करु शकलो नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.  सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती. त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असे माझे स्पष्ट मत आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा सुरुवात करायचा निर्णय घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
5 कोटी 71 लाख, म्हणजे 6 कोटी साधारण संख्या होती. यासाठी एक रकमी पैसे भरण्याचे आमचे नियोजन होते. लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतलाय आहे. भारत बायोटेक कडे ही आपण प्रयत्न करतोय,  आजच्या दिवशी फक्त 3 लाख लसचे डोस मिळाले. त्यात पुण्याला 20 हजार मिळतील. दुर्गम भागात ऑनलाईन नोंदणीची अडचण येते. -तरुणांना आणि ज्येष्ठाना लस कुठे दिली जाईल याची नियोजन करावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे सगळ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करावे लागले, असे ते म्हणाले.

 कुंभमेळा आणि सार्वत्रिक निवडणुका यामुळे इतर राज्यातही कोरोना बधितांचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, राज्यात ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेत आहोत. 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला, साखळी तोडण्यासाठी शेवट चा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. टेस्टिंगच्या संख्येपेक्षा डिस्चार्ज ची संख्या जास्त असेल तर बेड्सची कमतरता भासणार नाही. जुलै ऑगस्ट मध्ये तीसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय त्या दृष्टीने काळजी घेतोय आपण तयारी करतोय, असे ते म्हणाले.

लसीचे उत्पादन लक्षात घेता परदेशात तील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का याबाबत विचार सुरु आहे. या अनुभवातून भारत सरकार आणि वेगवेगळे राज्य ही सरकार ही शिकलेत. लसींचा पुरवठा कमी असल्याने 18 ते 44 वयोगटासाठी 3 लाख लस आली, त्यात पुणे जिल्ह्याला केवळ 20 हजार मिळाली आपल्यापेक्षा मुंबईला अधिक आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे जेव्हा रेमडेसिवीरचा चार्ज आल्यापासून परिस्थिती सुधारली आहे, असे अजित पवार म्हणाले.