नाशिक शहरात लॉकडाऊनच्या नियमांचा उडाला फज्जा

मुख्य बाजारपेठेतील दुकानं सातनंतरही सुरूच 

Updated: Mar 10, 2021, 09:25 PM IST
नाशिक शहरात लॉकडाऊनच्या नियमांचा उडाला फज्जा title=

नाशिक : नाशिक शहरात लॉकडाऊनच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला आहे. मुख्य बाजारपेठेतील दुकानं सातनंतरही सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. जिल्हा प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो लोकांना कोरोनाची भीतीच राहिलेली दिसत नाही. एमजी रोड परिसर, रविवार कारंजा परिसरात शेकडो ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते आहे.

नाशिक शहरात सातच्या आत घरात या नियमाचा लोकांकडून फज्जा उडवला जात आहे. बाजारपेठ तसेच शहरातील मुख्य व्यापारी पेठांमधील दुकाने देखील व्यापारी बिनधास्तपणे उघडी ठेवत आहेत. साडेसात वाजता एमजी रोड परिसर रविवार कारंजा परिसरात शेकडो ग्राहकांची गर्दी दिसते. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन आदेश केवळ कागदावरच आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.