मुंबई : शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणखी एक नवा निकष समोर आलाय. १०० टक्के शेतीवर उपजीविका असणा-यांनाच कर्जमाफी देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही विधान केलंय.
ज्यांची उलाढाल १० लाख रुपयांवर आहे त्यांना या कर्जमाफीमधून वगळण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांचा काहीतरी जोडव्यवसाय आहे त्यामुळे त्यांना वगळल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे केवळ शंभर टक्के शेतीवर उपजीविका असणा-यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.