थरारक अपघाताचा LIVE VIDEO! वेगाने येणारा टँकर थेट बसमध्ये घुसला आणि...

थरारक अपघाताचा LIVE VIDEO! वेगाने येणारा टँकर थेट बसमध्ये घुसला आणि... 

Updated: Apr 7, 2022, 01:43 PM IST
थरारक अपघाताचा LIVE VIDEO! वेगाने येणारा टँकर थेट बसमध्ये घुसला आणि...  title=

वाशिम : नांदेड महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि टँकरमध्ये समोरासमोर अपघात झाला. वाशिम इथल्या हॉटेल इव्हेंटोसमोर झालेल्या या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या अपघातात 3 जण ठार झाले असून 8 जण जखमी झाले आहेत. 

अपघात नेमका कसा घडला?
पुण्यावरुन खासगी बस यवतमाळला जात होती, वाशिम शहरालगत असलेल्या अकोला नाका परिसरातील हॉटेल इव्हेंटोजवळ ही बस आली असता समोरुन येणाऱ्या पाण्याच्या टँकरने बसला भीषण धडक दिली. पाण्याचा टँकर समुद्धी महामार्गावर जात होता. पण चालकाचं नियंत्रण सुटल्याने टँकर थेट समोर येणाऱ्या बसला धडकला. 

दोन्ही चालकांचा मृत्यू
खासगी बस आणि टँकरचा हा अपघात इतका भीषण होता की बस चालक आणि टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधल्या क्लीनरचाही या अपघातात मृत्यू झाला. बसमधील 7 प्रवासी आणि टॅंकरमधील एक व्यक्ती जखमी झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.