Maratha Andolan Live : राज्यपाल बैठकीनंतर मुख्यमंत्री-गृहमंत्री एकत्रित बैठक करणार

Maratha Andolan Live : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आता आक्रमक झालाय, आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशी जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावलीय. दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे.  साताऱ्यातल्या कराड शहरात विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर शिर्डीत बंदची हाक देण्यात आली आहे. 

Maratha Andolan Live : राज्यपाल बैठकीनंतर मुख्यमंत्री-गृहमंत्री एकत्रित बैठक करणार

30 Oct 2023, 14:55 वाजता

साताऱ्यात विराट मोर्चा
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आता आक्रमक झालाय... साता-याच्या कराडमध्ये सकल मराठा समाजाच्या विराट मोर्चाला सुरुवात झालीय. कराड शहराच्या दत्त चौकातून सुरु झालेला हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडक देणार आहे. मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन देणार आहे..

30 Oct 2023, 14:55 वाजता

परभणीत तहसीलदारांची कार फोडली
परभणीतील मानवतच्या तहसीलदारांची मराठा आंदोलकांनी कार फोडली...परभणीच्या मानवत तालुक्यातील माणोलीत मराठा तरुण आज सकाळपासून जलकुंभावर जाऊन आंदोलन करत होते...या आंदोलनाला मानवतेचे तहसीलदार भेट द्यायला गेले होते...त्यावेळी संतप्त आंदोलकांनी तहसीलदारांची गाडी फोडली...यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्यात...घटनास्थळी पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना समज दिली.