Maharashtra Breaking News LIVE: हिवाळी अधिवेशन नुकतेच संपले आहे. त्यानंतर राज्यात इतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ठळक घडामोडी आणि अपडेट्स एका क्लिकवर
24 Dec 2024, 14:55 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: पुणे शहरात आढळल्या बनावट नोटा
पुणे शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या रस्ता पेठेत बनावट नोटा बाळगणाऱ्या आरोपीला समर्थ पोलिसांनी केली अटक. गौरव रामप्रताप सविता (वय २४, रा. जामनगर, गुजरात) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
24 Dec 2024, 14:22 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: भुजबळ हे राज्याचे मोठे नेतेः सुप्रिया सुळे
भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाही तर राज्याचे खुप मोठे नेते राहिले आहेत. शुन्यातून विश्व त्यांनी निर्माण केलेय.शरद पवारांच्या बाजूला त्यांची जागा असायची. आता जे होतयं ते त्यांच्या पक्षाचा युतीचा प्रश्न. एवढ्या मोठ्या नेत्याचा एक लढवय्या नेता म्हणून ओळख आहे.बेळगावच्या लढ्यासाठी ते ताकदीने उतरले होते त्यांना अटक ही झाली होती.भुजबळ यांच्या कुटुंबाने मोठा संघर्ष केला आहे.
24 Dec 2024, 13:53 वाजता
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत दुपारी 4 वाजता भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी बैठक होणार आहे. या बैठकीत राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार आहे.
24 Dec 2024, 13:27 वाजता
बच्चू कडू नितीन गडकरी यांच्या भेटीला
प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांचा पराभव झाला होता. त्यानंतर बच्चू कडू यांच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार यासंदर्भात तर्कवितर्क लावले जात असताना आज बच्चू कडू हे नागपूरमधील नितीन गडकरी यांच्या घरी त्यांची भेटी घेण्यासाठी पोहोचले आहेत.
24 Dec 2024, 12:54 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष ठेवून नियोजन करा, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना अवाहन
कालपासून राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या पुढे कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
24 Dec 2024, 12:16 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: आमच्यात बंगल्यावरुन वाद होणार नाहीतः उदय सामंत
अमच्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले आहेत आणि फ्लॅट सुद्धा दिले गेले आहेत. आमच्यामध्ये बंगल्यावरून वाद होणारं नाही हे नक्की, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
24 Dec 2024, 11:34 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: चार दिवसाच्या खंडानंतर सोलापुरात कांदा लिलावास सुरुवात
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल चार दिवसानंतर कांदा लिलावास सुरुवात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या विरोधात माथाडी कामगारांचे आंदोलन अखेर मागे. सोमवारपासून कांदा लिलाव सुरळीत सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील समाधान
24 Dec 2024, 10:57 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कंटेनरला अपघात
अवजड मशीन्स घेऊन जाणारा कंटेनर भोस्ते घाटात कलंडला. 100 मीटर अंतरापर्यंत डिव्हायडरला आदळत कंटेनर झाला पलटी. मागे पुढे गाडी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी नाही
24 Dec 2024, 10:38 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राचा बिहार झालायः संजय राऊतांची सरकारवर टीका
महाराष्ट्राचा बिहार झाल आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत बीडचे ते मंत्रिमंडळामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून बीड परभणी मध्ये जायला पाहिजे होतं. ज्यांनी हत्या घडवल्या त्यांना पाठीशी घालत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मानवतेचा खून झाला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
24 Dec 2024, 10:37 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या आरीफचा ‘मातोश्री’वर सन्मान
नीलकमल बोट दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारा 'देवदूत' आरीफ बामणे याचा आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आरीफने दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.