Maharashtra Breaking News LIVE Updates: आज विधानसभा महासंग्राम! सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला होणार सुरुवात

Maharashtra Assembly Election Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असली तर उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींवर विशेष लक्ष असेल. याचप्रमाणे दिवसभरातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स तुम्हाला येथे जाणून घेता येतील...

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज विधानसभा महासंग्राम! सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला होणार सुरुवात

19 Nov 2024, 15:31 वाजता

विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून रवाना

19 Nov 2024, 15:16 वाजता

निवडणुक आयोगाने विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकुरांची पत्रकार परिषद थांबवली

 

19 Nov 2024, 14:35 वाजता

मी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. निवडणूक आयोग सर्व चौकशी करेल - विनोद तावडे

 

19 Nov 2024, 14:10 वाजता

माझी बॅग आजही तपासली, विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार - उद्धव ठाकरे

माझी बॅग आजही तपासली विनोद तावडेंची बॅग कोण तपासणार 

अनिल देशमुख यांच्यावर दगड हल्ला झाला दगड कोण तपासणार 

उध्दव ठाकरे यांचा तुळजापुरातून सवाल    

उध्दव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून तुळजाभवानी देवीची पूजा 

विधानसभा निवडणूक प्रचार सांगता झाल्यावर उध्दव ठाकरे आई तुळजाभवानीच्या चरणी 

ठाकरे कुटुंबाकडून आई तुळजाभवानीला साडीचोळी

19 Nov 2024, 13:54 वाजता

'तावडे 5 कोटी वाटायला आले होते'; हिंतेंद्र ठाकूरांचा आरोप! विरारच्या हॉटेलमध्ये तुफान राडा

विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तुफान राडा झाला आहे. येथील प्रसिध्द विवांता हॉटेलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला असून त्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असताना बहुजन विकास आघाडीने त्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा केला जात आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये धुमाकूळ घातला. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर

19 Nov 2024, 12:19 वाजता

ठाकरेंच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी; पोलीस स्टेशनमध्ये गर्दी

उद्धव ठाकरे गटाचे बडनेऱ्याचे उमेदवार सुनील खराटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ऐन निवडणूक तोंडावर असताना धमकी आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. सुनील खराटे यांच्याकडून राजापेठ पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित आहेत. जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी निषेध नोंदवला आहे. धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची खराटे यांची मागणी आहे.

19 Nov 2024, 11:31 वाजता

मुस्लिम भागात आधार कार्ड जमा करुन...; शिंदेंच्या पक्षावर ठाकरेंच्या नेत्याचा गंभीर आरोप

शिंदे गटाची मंडळी मुस्लिम भागात आधार कार्ड जमा करून, बोटाला शाई लावायची असे प्रकार करत आहे. असे असताना निवडणूक आयोग आणि पोलीस आक्रमक कारवाई का करत नाही. कार्यकर्ते गेल्यावर काहीतरी तोडामोड कारवाई होते. पोलीस यंत्रणेच्या देखरेखीखाली हे सर्व सुरू असल्याचे मला कार्यकर्ते सांगतात. पोलिसांना याबाबत सांगितले आहे. आमच्या प्रमुख कार्यकर्ते विरोधात तडीपार कारवाई केली जात आहे. विशेष करून हे सर्व औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. सर्वांना हजार दोन हजार द्यायचे आहेत. 10 ठिकाणी असे नाही झाले. आजपण काही ठिकाणी असे होण्याची शक्यता आहे. आमचे कार्यकर्ते आम्ही आलर्ट ठेवले. पोलिसांनी फक्त दीड हजार रुपये दाखवले आहे, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

19 Nov 2024, 10:08 वाजता

शिरसाठ जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवली सराटीमध्ये दाखल

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ अंतरवली सराटीला मनोज जरांगे यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. 'मनोज जारांगे हा हिंदुत्व तोडणार राक्षस' अशी टीका कालीचरण महाराजांनी केलेली. ही सभा संजय शिरसाठ यांच्या मतदारसंघात झाली होती. यामुळे शिरसाठ जरांगे यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. 

19 Nov 2024, 09:41 वाजता

महाराष्ट्रात सत्ताबदल होणं अटळ असल्याने...; आदित्य ठाकरेंचं विधान

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या भीषण हल्ल्याचा तीव्र निषेध! असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी आपल्या सोशल मीडियावरुन भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्रात सत्ताबदल होणं अटळ असल्याने हादरलेल्या महाराष्ट्रद्रोही समाजकंटकांकडून असे भ्याड हल्ले सुरु झालेले दिसतात, असा टोलाही आदित्य यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

19 Nov 2024, 09:39 वाजता

पुणे जिल्ह्यात एकूण उमेदवार? मतदार किती? पाहा आकडेवारी

पुण्यात विधानसभा मतदान साहित्याचे वाटप सुरू झालं आहे. जिल्ह्यात एकूण 8462 मतदानकेंद्रे आहेत. पुणे जिल्ह्यातील 21 मतदारसंघात एकूण 303 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार संख्या 88 लाख 49 हजार 590 इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण पुरुष मतदारांची संख्या 45 लाख 79 हजार 216 तर महिला मतदारांची संख्या 42 लाख 79 हजार 569 इतकी आहे. पुणे जिल्ह्यात 805 तृतीयपंथी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा मतदारसंघात असून त्यांची संख्या 6 लाख 63 हजार इतकी आहे. इंदापूर, भोर, मावळ आणि शिवाजीनगर पुणे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रं आहेत.