Loksabha Election 2024 Live : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला; उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणूक 2024 साठी पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल शुक्रवार होणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

Loksabha Election 2024 Live : तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत हरला;  उद्धव ठाकरे यांचा अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीची पडघम वाजलंय. येत्या 19 एप्रिल शुक्रवार देशात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघ भाजपचा गड नागपूरसोबत रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. महत्त्वाच्या जागवर उमेदवार कोण हा तिढा सुटला असला तरी काही ठिकाणी अजून आपल्या उमेदवार कोण हे मतदारांना अजून माहिती नाही. 

15 Apr 2024, 16:41 वाजता

नवी मुंबईत दुहेरी मालमत्ता कर आकारणी केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सिडको डबल कर आकारणी करत आहेत. ही दुहेरी कर आकारणी जुलूमशाही असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  भाजपच्या पनवेलमधील माजी नगरसेविका निना घरत यांचा ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसंच यावेळी मनसेचेही पदाधिकारी ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी डबल कर आकारणीवरून निशाणा साधला.

15 Apr 2024, 12:46 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : माढ्याच्या जागेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरु 

माढ्याच्या जागेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरु झालंय. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळालीय. त्यामुळे अभयसिंह जगताप नाराज आहेत. पुढील दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचं जगताप यांनी म्हटलंय. त्याआधी त्यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेतली. त्यामुळे आता अभयसिंह जगताप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय.

 

15 Apr 2024, 12:45 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच आहे. या जागेवरून महायुतीनं 'वेट अँड वॉच'चं धोरण स्वीकारल्याची माहिती सुत्रानं दिलीय. नारायण राणे आणि किरण सामंत हे दोघेही या जागेसाठी उत्सुक आहेत. मात्र, शिंदे गटानं नारायण राणेंच्या घराणेशाहीवर प्रश्न उपस्थित केल्याची माहिती मिळतेय.  तिढा कायम असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय...

 

15 Apr 2024, 12:44 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट 

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीय...राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी कपिल पाटलांनी भेट घेतली...कपिल पाटील हे महायुतीचे भिवंडीचे उमेदवार आहेत...गुढीपाडवा मेळाव्यात मनसेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केलाय...त्यानंतर कपिल पाटील राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेयत...

 

15 Apr 2024, 12:43 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नाराजी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात

महायुती उमेदवारांची घोषणा होत असताना अनेक ठिकाणी उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. ही नाराजी शमवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले.. फडणवीसांनी अनेक नेत्यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. विशेषत: 4 दिवसात फडणवीसांना नागपुरात भेटण्यासाठी नेत्यांची, इच्छुकांची, उमेदवारांची रिघ लागलीय..पाहुयात कोणत्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामागचं कारण काय.. 

 

15 Apr 2024, 12:38 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शशिकांत शिंदेंचं साताऱ्यात शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदेंकडून साता-यात शक्तिप्रदर्शन केलं जातंय...उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवारही साता-यात दाखल झालेयत...गांधी मैदानातून रॅलीला सुरूवात झालीय...सातारा शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात येतेय...

 

15 Apr 2024, 12:36 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : आबा बागुल यांनी घेतली फडणवीसांची भेट 

काँग्रेस नेते आबा बागुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय...दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे...यावेळी आबा बागुलांसोबत त्यांची दोन मुलं अमित आणि हेमंत बागुलही उपस्थित होते...आबा बागुल हे पुण्यातून काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज आहेत...मात्र, भेटीमागे राजकीय कारण नसल्याचा दावा बागुल कुटुंबीयांनी केलाय...एका लग्न समारंभात भेट झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात आलीय...

15 Apr 2024, 11:23 वाजता

Devendra Fadnavis PC Loksabha Election 2024 Live Updates : उत्तमराव जानकर फडणवीसांच्या भेटीला, जानकरांची नाराजी दूर होणार?

माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीसांच्या घरी महत्त्वाची बैठक होतेय. त्यासाठी रणजीतसिंह निंबाळकर, उत्तमराव जानकर, जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील दाखल झालेत. थोड्याच वेळात त्यांच्यासोबत फडणवीस चर्चा करणारेत. नागपुरातल्या देवगिरी बंगल्यावर या सर्व राजकीय घडामोडी सुरू आहेत. सोलापुरातून उमेदवारी न मिळाल्याने जानकर हे नाराज आहेत...त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका हा भाजपला सोलापूर आणि माढ्यामध्ये बसू शकतो...यामुळे त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत...

 

15 Apr 2024, 10:38 वाजता

Devendra Fadnavis PC Loksabha Election 2024 Live Updates : मुद्रा योजनेत 60% महिला लाभार्थी आहेत. मुद्रा योजनेत कर्जाच्या मर्यादा 20 लाख करण्यात येईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सिंचन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. पीएम पीक विमा अजून मजबूत करण्यात येणार आहे. त्याशिवाय भाजीपाल्याच्या स्टोरेजसाठी व्यवस्था केली जाणार आहे. गरिबांना मोफत वीज देण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. तर पेपरफुटीसंदर्भात कडक कायदा करण्यात येणार असल्याचही ते यावेळी म्हणाले. 

15 Apr 2024, 10:32 वाजता

Devendra Fadnavis PC Loksabha Election 2024 Live Updates : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची नागपुरात पत्रकार परिषदेतून संकल्पपत्र नाही तर मोदींची गॅरेंटी असं आश्वासन दिलं आहे. भाजपाच्या जाहीरनाम्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की. सोलारच्या माध्यमातून वीजबील शून्य करण्याचा प्रयत्न असणार आहे. हे संकल्पपत्र तरुण, महिला, शेतकऱ्यांच्या हिताच आहे. पीएम आवास योजनेतून गरिबांना 3 कोटी घरांचा संकल्प आहे. तसंच सिलेंडरऐवजी पाईपलाईनने गॅस देण्याचा ध्येय असल्याच त्यांनी यावेळी सांगितलं.