Loksabha Election 2024 Live : भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत

Loksabha Election 2024 Live Updates : तिथं महाविकासआघाडीकडून काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली जात असतानाच इथं महायुतीमध्ये मात्र काही जागांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत.   

Loksabha Election 2024 Live : भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत

Loksabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटून गेली असली तरीही राज्याच्या काही मतदारसंघांमधील जागावाटपाचा पेच मात्र राज्यातील मोठ्या पक्षांना सोडवता आलेला नाही. त्यातच काही नव्या उमेदवारांना संधी मिळाल्यामुळं प्रस्थापित आणि विद्यमान खासदारपदी असणाऱ्या कैक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी पक्षात बंड करण्याची तयारी दाखवली आहे. 

नेहमीच विधानसभा निवडणुकींसाठी स्वारस्य दाखवणाऱ्या अनेक नेत्यांनी यावेळी दिल्लीदरबारी जाण्यात रसदाखवल्यामुळं उमेदवारीवरून महायुतीपासून महाविकासआडीपर्यंत चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीतही 9 जागांचा तिढा अजूनही कायम असून,  मुंबईतल्या 3 जागांसह ठाणे, नाशिक, संभाजीनगरात उमेदवार ठरेना, वर्षावर आज महत्त्वाच्या बैठकांची सत्र होताना पाहायाला मिळणार आहेत. 

5 Apr 2024, 18:33 वाजता

भर पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अडचणीत आलेत. खेकड्याचा छळ केल्याप्रकरणी रोहित पवारांवर कारवाई करावी, अशी मागणी पेटा या प्राणीप्रेमी संघटनेनं केलीय. पेटानं निवडणूक आयोगाला तसंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून रोहित पवारांची तक्रार केली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर अँब्युलन्स कंत्राट घोटाळ्याचा आरोप करताना रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत जिवंत खेकडा दाखवला होता. खेकड्यांची प्रवृत्ती आरोग्य विभाग पोखरून काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र पेटानं त्यावर आक्षेप घेतलाय.

5 Apr 2024, 14:10 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : महायुतीच्या जागावाटपात शिवसेना आक्रमक

मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांनी राजकिय कौशल्य दाखवत मतदारसंघातील नाराजी आणि बंडखोरी दोन्हींवर अंकुश ठेवला. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा कायम. शिवसेनेनं तीन लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांएैवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तरी देखील या मंतदारसंघात बंडखोरी झाली नाही. मतदारसंघातील उमेदवारांबद्दलची नाराजीची गंभीर दखल घेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी तर दिलीच. शिवाय मतदारसंघात बंडखोरी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांचे राजकिय पुर्नवसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांनी विद्यमान खासदारांना दिले. 

5 Apr 2024, 13:30 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : दीपक निकाळजे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल

आरपीआयचे नेते दिपक निकाळजे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. दिपक निकाळजे यांचा आरपीआय गट हा मविआला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह दीपक निकाळजे मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

5 Apr 2024, 13:10 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का 

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे, वंचितने ऐंनवेळेवर उमेदवार बदलवून अभिजित राठोड यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते. मात्र अर्जात त्रुटी असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज करण्यात आला आहे.यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का. 

5 Apr 2024, 12:12 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी केरळात 

राज्यातील प्रचार नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी केरळला प्रचाराला जाणार. फडणवीस स्टार प्रचारक असल्याने वेगवेगळ्या राज्यात दौरे करणार. 

5 Apr 2024, 11:56 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, के सी वेणुगोपाल, पी चिदंबरम, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. काँग्रेसनं या जाहीरनाम्याला ‘न्यायपत्र’ असं नाव दिलं आहे.

5 Apr 2024, 11:32 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाची नाराजी दूर करणार?

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विशाल पाटील यांना संसदेत पाठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविण्याचा पर्याय? सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने चंद्रावर पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचार सुद्धा सुरू केला आहे. यामध्ये  मध्यम मार्ग नेमका काय काढायचा? यावर महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते विशाल पाटील काँग्रेसकडून त्याच लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विशाल पाटील आणि काँग्रेस नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांची यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून पर्याय  काँग्रेस पक्षाला देण्यात आल्याची माहिती आहे. 

5 Apr 2024, 09:52 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता

महायुतीत तिढा निर्माण करून राहिलेल्या नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. इथं छगन भुजबळांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. फडणवीस-पवारांमध्ये नाशिकच्या जागेवर सव्वा तास चर्चा झाली असून, आता महायुतीकडून भुजबळांना उमेदवारी मिळण्याची चिन्हं आहेत. 

5 Apr 2024, 08:40 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? रोहित पवारांचा तटकरेंना सवाल 

'तटकरे साहेब तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये जायचंच असतं तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो. आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली त्याप्रमाणे अजितदादांचीही साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? तेवढं सांगा!', अशा शब्दांत रोहित पवार यांनी थेट तटकरेंनाच सवाल केला. 

5 Apr 2024, 07:55 वाजता

Loksabha Election 2024 Live Updates : शिवसेनेकडून संजय निरुपय यांची चाचपणी सुरू

काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या संजय निरुपम यांची उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. 
त्यामुळं संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. निरुपम यांच्यासोबतच शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या मराठमोळ्या कलाकारांची देखील चाचपणी सुरु असल्याचं वृत्त समोर येत आहे.